esakal | हुतात्मा एक्‍सप्रेस 2 ऑक्‍टोबरपर्यंत बंदच!
sakal

बोलून बातमी शोधा

Railway

हुतात्मा एक्‍सप्रेस 2 ऑक्‍टोबरपर्यंत बंदच!

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : सोलापूर ते पुणे रेल्वे मार्गावरील भाळवणी ते भिगवण या 55 किलोमीटरच्या दुहेरीकणाचे काम सुरु असल्याने ता. 1 ते 16 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली होती. मात्र, काम पूर्ण झाले नसल्याने पुन्हा ता. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबरदरम्यान हुतात्मा एक्‍सप्रेस रद्द करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. रेल्वे प्रशासनाने सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्‍सप्रेस रद्द करण्याला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

सोलापूर विभागांत दुहेरीकणाचे काम 2010 पासून सुरु आहे. हे काम रेल्वे प्रशासनाने आरव्हीएनएल अर्थांत रेल विकास निगम लिमिटेड यांना दिले आहे. त्यामुळे विभागांतील भाळवणी ते भिगवण या 55 किमीच्या कामासाठी सोलापूरकरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्‍सप्रेस बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे. भाळवणी ते भिगवण दरम्यान दुहेरीकरणाबरोबर विद्युतीकरणाचे काम इंजिनिअरींग ब्लॉक घेउन केले जात असल्याची माहिती आरव्हीएनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हुतात्मा एक्‍सप्रेस बंद असल्याने पुण्याकडे जाणाऱ्या सोलापूरच्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहनांचे भाडे जास्तीचे असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याच्या प्रतिक्रिया सामान्य प्रवाशांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केल्या आहेत. त्यामुळे आणखीन काही दिवस तरी हुतात्मा एक्‍सप्रेसने प्रवास, करण्यासाठी सोलापूरकरांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. भाळवणी आणि भिगवण दरम्यान सुरु असलेल्या कामाची देखभाल आणि दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

हेही वाचा: 'एकरुख'साठी डिसेंबरअखेरपर्यंत मिळणार 50 कोटी - सिद्धाराम म्हेत्रे

दीड हजार प्रवाशांची गैरसोय

हुतात्मा एक्‍सप्रेसने पुण्याकडे जाण्यासाठी सोलापूरकरांचा प्रचंड प्रतिसाद या गाडीस असतो. दररोज सरासरी 1 हजार 500 प्रवासी या गाडीने प्रवास करतात. सतत गाडी रद्द होत असल्याने सोलापूरकरांची प्रचंड गैरसोय होत आहे. मात्र, एक संपूर्ण रेल्वे रद्द होत असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे कोईमतूर-कुर्ला-एलएलटी एक्‍सप्रेस ही गाडी सकाळी 6 वाजता असल्याने या गाडीवर प्रवाशांचा भार येणार आहे. मात्र, या गाडीचे आरक्षित तिकीट वेंटींगचे आणि तिकीट दर जास्त असल्याने ही गाडी सोलापूरकरांना परवडनारी नसल्याचे देखील प्रवाशांनी "सकाळ' बोलताना सांगितले.

हुतात्मा एसक्‍प्रेस रद्द करण्यात येत असल्यामुळे चाकरमानी, विद्यार्थी, उद्योजक, शेतकरी यांना खासगी वाहनांचा आधार घेउन प्रवास करावा लागत आहे. खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने पैसे देखील जास्त लागत आहेत. त्यामुळे हुतात्मा एक्‍सप्रेस केव्हा सुरू होणार याचीच सोलापूरकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हुतात्मा एक्‍सप्रेस लवकरात लवकर सुरू करावी.

- संजय पाटील, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ, सोलापूर

दुहेरीकरणाचे कामासाठी इंजिनिअरिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे हुतात्मा एक्‍सप्रेस रद्द करण्यात आली आहे. जसे दुहेरीकरणाचे आणि विद्युतीकरणाचे काम सुरु होताच गाडी सुरु करण्यात येईल.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

loading image
go to top