
सोलापूर : सोलापुरात आयटी पार्कसाठी जागा शोधाच्या हालचाली सुरू आहेत. सध्या जी जागा उपलब्ध आहे, ती जागा अंतिम करण्यासाठी लवकरच हैदराबाद व पुणे येथील नामवंत उद्योजक येणार आहेत. त्यांच्या पसंतीनंतरच आयटी पार्कसाठी जागेची अंतिम निवड केली जाणार आहे. पण, या उद्योजकांचा दौरा खूपच गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. जागा पाहणीनंतर एक बैठकही होण्याची शक्यता नाकारत येत नाही.