Solapur News : हैदराबाद संस्थानमधील गावांचे पुरावे शोधा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

हैदराबाद संस्थानामधील ५८ गावांचा सोलापूर जिल्ह्यात समावेश आहे.
Maratha Reservation
Maratha Reservationsakal

सोलापूर - हैदराबाद संस्थानामधील ५८ गावांचा सोलापूर जिल्ह्यात समावेश आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश निघाल्यानंतर याच न्यायालयाने सोलापूर जिल्ह्यातील मुक्तिपूर्व मराठवाड्यातील गावातील मराठा समाजालाही कुणबी प्रमाणपत्रे मिळविता येतात.

यासाठी या गावांचा शोध जिल्हा प्रशासनाने करावा व मराठवाड्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधून प्रमाणपत्रे देण्यास प्रारंभ करावा, अन्यथा आंदोलन करावे लागले असा इशारा संबधित गावातील नागरिकांनी दिला आहे.

मनोज जरांगे-पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणानंतर मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महसुली व कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील आठ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची अभ्यास समिती नेमण्यात आली आहे.

या समितीत सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश करावा तसेच सोलापूर जिल्ह्यातील तत्कालीन मराठवाड्यातील ५८ गावांतील मराठा समाजाला न्याय मिळावा, या आशयाचे निवेदन मोहोळ तालुक्यातील एकुरके, डिसकळ, भोयरे, देगाव, मसले चौधरी येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच दिले आहे.

गुरुवारी मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी संबधित गावातील अनेक नागरिक सोलापूर येथे आले होते. त्यांनी धाराशिव जिल्हा प्रशासन व सोलापूर जिल्हा प्रशासनाने या ५८ गावांचा शोध करावा. निजामाच्या श्वेतपत्रिकेतील ५८ गावांची यादी मिळाल्यानंतर या गावांबद्दलची माहिती जिल्हा प्रशासन तसेच तालुका प्रशासनाकडे असल्यास ती जाहीर करावी, अशी मागणी या गावातील नागरिकांनी केली आहे.

यावेळी पंडित ढवण, बालाजी साठे, हनुमंत पोटरे, दादासाहेब चव्हाण, तुकाराम मोटे, शारदा मोटे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com