SSC student celebrates 100 percent marks after revaluation
sakal
माढा - दहावीचा निकाल लागला आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मुलीला ९९.४० टक्के गुण मिळाले होते. माढा तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यात ती प्रथम आली होती. नातेवाईकांचे फोन, अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाचे संदेश सुरू होते. बहुतेकांसाठी हा क्षण समाधानाचा असता. पण त्या घरात एक मुलगी मात्र शांत होती.