"पुन्हा येईन'ची चर्चा झाली अन्‌ सोलापुरात ते पुन्हा आले 

nimbalkar photo
nimbalkar photo
Updated on

सोलापूर : राज्याच्या राजकारणात आणि सोशल मिडियात "मी पुन्हा येईन' हे वाक्‍य भलतेच गाजले आहे. राज्यात या वाक्‍याचे काहीही होवो परंतु सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये "मी पुन्हा येईन' हे वाक्‍य खरे ठरले आहे. सोलापूर बाजार समितीच्या सचिवपदी सहाय्यक निबंधक मोहन निंबाळकर यांची प्रतिनियुक्तीने पुन्हा नियुक्ती झाली आहे. 
हेही वाचा - बळिराजासाठी खुशखबर..."अवकाळी'साठी आणखी एक हजार कोटी 
डिसेंबर 2019 मध्ये निंबाळकर यांना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निरोप देण्यात आला होता. त्यावेळी "मी पुन्हा येईन' या वाक्‍यावर काही जणांनी भर दिला होता. निरोप समारंभातील या वाक्‍याची नंतर काही दिवस चर्चाही झाली. साधरणता एक ते दीड महिन्यात सचिवपदी निंबाळकर सोलापूर बाजार समितीत पुन्हा आल्याने चर्चा होऊ लागली आहे. सहकार व पणन विभागाने निंबाळकर यांच्या प्रतिनियुक्तीचा आदेश बुधवारी (ता. 29) काढला आहे. बुधवारी आदेश आल्यानंतर निंबाळकर यांनी आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदाचा पदभार स्वीकारला आहे. 
हेही वाचा - सोलापूरची राष्ट्रवादी पुन्हा पडली तोंडघशी 
जानेवारी 2018 मध्ये बाजार समितीच्या सचिवपदी पहिल्यांदा निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर निंबाळकर यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव नाकारण्यात आला होता. डिसेंबर 2019 मध्ये निंबाळकर यांनी सोलापूर बाजार समितीच्या सचिवपदाचा पदभार सोडला होता. त्यानंतर बाजार समितीच्या सचिवपदाची जबाबदारी उमेश दळवी यांच्याकडे आली होती. सहकार विभागाने निंबाळकर यांना प्रतिनियुक्तीने पुन्हा एकदा सोलापूर बाजार समितीच्या सचिवपदाची जबाबदारी दिली आहे. बाजार समितीवर शासनाच्यावतीने नियुक्त केले जाणारे निंबाळकर हे पहिले सचिव आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com