esakal | "विधानसभेचे अधिवेशन होते तर मग जि.प.ची सर्वसाधारण सभाच ऑनलाईन का?'
sakal

बोलून बातमी शोधा

Z. P.

"विधानसभेचे अधिवेशन होते तर मग जि.प.ची सर्वसाधारण सभाच ऑनलाईन का?'

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सोमवारी होणारी जिल्हा परिषदेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा आम्ही सदस्य एकत्रितरीत्या बंद पाडून सभा ऑफलाइन (सभागृहात) घेण्यास भाग पाडू, असा इशारा सचिन देशमुख यांनी दिला.

सांगोला (सोलापूर) : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे मुंबईत अधिवेशन (Assembly session in Mumbai) होते, सोलापुरात अधिकाऱ्यांच्या, मंत्र्यांच्या बैठका होतात, पंढरपूर - मंगळवेढा पोटनिवडणूक होते; मग जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) सर्वसाधारण सभा ऑफलाइन का होत नाहीत? असा प्रश्न करीत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा परिषदेचे सदस्य सचिन देशमुख (Sachin Deshmukh) यांनी सोमवारी होणारी ऑनलाइन सर्वसाधारण सभा आम्ही सदस्य एकत्रितरीत्या बंद पाडून सभा ऑफलाइन (सभागृहात) घेण्यास भाग पाडू, असा इशारा दिला. (If there is a session of the Legislative Assembly, then the question is why the general meeting of the Zilla Parishad is online)

हेही वाचा: राज्य मंत्रिमंडळाचा होणार विस्तार? प्रणिती शिंदेंना मिळणार मंत्रिपद?

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेविषयी बोलताना जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख म्हणाले की, सर्व जिल्हा परिषदेच्या सदस्यांची सर्वसाधारण सभा ऑफलाइन मीटिंग घेण्याची विनंती होती. असे असताना सोमवारी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जाणीवपूर्वक ऑनलाइन घेण्याचे नियोजन केले आहे. कोरोनाच्या (Covid-19) महामारीमुळे सर्वसामान्यांच्या अनेक प्रश्नांवर सभागृहात चर्चा होणे सध्या गरजेचे आहे. परंतु सर्वसामान्यांच्या प्रश्नांना बदल देण्यासाठीच अधिकाऱ्यांनी ही सर्वसाधारण सभा ऑनलाइन ठेवली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रश्न मांडता येणार नाहीत. तसेच ही सर्वसाधारण सभा अधिकाऱ्यांनी संगनमताने ऑफलाइन सभा होऊ नये म्हणून प्रयत्न केलेले आहेत.

हेही वाचा: "महाविकास आघाडीत कॉंग्रेसची घुसमट! राष्ट्रवादी नऊ जिल्ह्यांपुरतीच'

जिल्हा नियोजन भवनात सर्व मीटिंग चालतात, मुंबईत विधानसभेचे अधिवेशन चालते, परंतु जिल्हा परिषदेची सर्वसाधारण मीटिंग चालू शकत नाही, याचा अर्थ काय? जिल्हा परिषदेच्या सभेची परवानगी देण्याचा कलेक्‍टरना काय अधिकार आहे? सभागृहात मीटिंग घेण्यास अडचण काय? याबाबत काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे. हे सर्व जाणीवपूर्वक चालू आहे. आम्ही सदस्य सोमवारी सकाळी अकरा वाजता एकत्रित जिल्हा परिषदेमध्ये येऊन ऑनलाइन मीटिंग बंद पाडू व ऑफलाइन मीटिंग घेण्यास भाग पाडू, असेही जिल्हा परिषद सदस्य अँड. सचिन देशमुख यांनी सांगितले.

सर्वसाधारण सभा होणे गरजेचे

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होणे हे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी सभा ऑफलाइन घेण्यास प्राधान्य द्यावे; अन्यथा प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी सदस्यांना एकत्रित करत अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन यंत्रणेवरूनच ही सभा घेतली जावी.

- अनिल मोटे, सभापती, कृषी व पशुसंवर्धन

loading image