Solapur Crime: सांगोल्यात माेठी कारवाई! १८ लाख ५० हजारांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, जिल्ह्यात खबळबळ

Illegal Gutkha Worth ₹18.5 Lakh Seized in Sangola : अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी (ता. २२) रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास सोनंद‌ - कडलासमार्गे सांगोला जाणाऱ्या मार्गावर वाहन (एम. एच - ४५, ए. एफ - ९६०८) हे संशयास्पदरीत्या भरधाव येताना दिसले.
FDA Action in Sangola: Gutkha Seizure Shocks District
FDA Action in Sangola: Gutkha Seizure Shocks Districtsakal
Updated on

सांगोला : मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासनाने सांगोल्यात गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडून त्यामध्ये अंदाजे १८ लाख ५१ हजार रुपये किमतीचा गुटखा व ७ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण २५ लाख ५१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई २२ जून रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com