

Girl’s Father Refused Deal: Dark Truth Behind Kidney Sale Network
sakal
-श्रीनिवास दुध्याल
Solapur Kidney Racket : किडनी विक्री रॅकेटमधील रामकृष्ण सुंचू हा मागील ८ वर्षांपासून किडनी विक्री रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. आठ वर्षांपूर्वी सुंचू याने विडी घरकुलमधील एका मुलीला लग्नाची मागणी घातली होती. त्यावेळी मुलीच्या वडिलांना सुंचू याच्या संपत्तीचा संशय आला होता. त्यामुळे त्यांनी मुलगी देणार नाही असे सांगितले होते. त्यावरून सुंचू हा किमान ८ वर्षांपासून रॅकेट चालवत असावा, असे स्पष्ट होत आहे.किडनी तस्करीत सापडल्यानंतर रामकृष्णच्या संपत्तीची आणि केलेल्या धार्मिक मदतीची परिसरात चर्चा आहे.