
Solapur Municipal Corporation demolishes unauthorized structure of Navjeevan English Medium School after finding construction violations.
Sakal
सोलापूर: मजरेवाडी येथील आपलानगरातील नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलची अतिक्रमित भिंत जेसीबीने पाडून टाकण्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली. ही कारवाई करताना मोठा विरोध झाला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत चारजणांना ताब्यात घेतले. महापालिका बांधकाम, नगररचना व अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.