
सोलापूर : महापालिकेच्या प्रसूतिगृहातील रुग्ण पळविण्याच्या घटनेनंतर बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टखाली आढळलेल्या विविध त्रुटीमुळे अखेर नवी पेठेतील श्रेयस नर्सिंग होम तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात आले. डॉ. सुमीत सुरवसे याच्या रुग्णालयाचा परवाना (लायसन) रद्द करण्यात आला. या कारवाईनंतरही डॉ. सुरवसे यांनी बाळ्यात बिनधास्त रुग्ण तपासणी सुरू ठेवली होती. या ठिकाणी सर्वच यंत्रणा संशयास्पद आढळून आल्या.