''नेत्यांची सुरक्षा ठेवायची की काढायची, हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रश्न आहे. पण, राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला गृहमंत्री जबाबदार आहेत.''
सोलापूर : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकार एक म्हणत आहे आणि त्यांचे मंत्री दुसरंच बोलतात. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणाबाबत (Muslim Reservation) आमची पूर्णपणे सहकार्याची भूमिका आहे. याबाबत मी आणि अमोल कोल्हे हे पार्लमेन्टमध्ये बोललो आहोत. आधी मोदी सरकार होते आता एनडीए सरकार आहे. संसदेत हा मुद्दा येऊ द्या आम्ही त्याबाबतीत सकारात्मकच आहोत. आरक्षणाबाबत पार्लमेन्टमध्ये सर्वात जास्त मी बोलले आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला.