esakal | Video : बोरगाव-घोळसगावच्या वाहत्या ओढ्याच्या पुलावरून जीवघेणा प्रवास!
sakal

बोलून बातमी शोधा

(Video) बोरगाव-घोळसगावच्या वाहत्या ओढ्याच्या पुलावरून जीवघेणा प्रवास!

अक्कलकोट तालुक्‍यातील बोरगाव व घोळसगाव तसेच परिसरात या आठवड्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बोरगाव ते घोळसगाव ओढ्यावरील पुलावर सतत पाणी येऊन वाहतूक बंद पडत आहे.

बोरगाव-घोळसगावच्या वाहत्या ओढ्याच्या पुलावरून जीवघेणा प्रवास!

sakal_logo
By
राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील (Akkalkot Taluka) बोरगाव व घोळसगाव तसेच परिसरात या आठवड्यात जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावल्याने बोरगाव ते घोळसगाव ओढ्यावरील पुलावर सतत पाणी येऊन वाहतूक बंद पडत आहे. यामुळे परिसरातील बोरगाव, वागदरी व घोळसगाव या गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक शेतकरी (Farmers) प्रवासी पलीकडे अडकले आहेत. बोरगाव ग्रामस्थांची 60 टक्के शेती ही ओढ्याच्या पलीकडे असून, त्यांना त्यांच्या शेतीकडे जनावरांना चारापाणी करण्यासाठी जाणे अडचणीचे ठरत आहे. काही जण धोकादायकरीत्या नाइलाजाने पाण्याने वाहणाऱ्या ओढ्याच्या पुलावरून जीव धोक्‍यात घालून जात आहेत.

हेही वाचा: आंतरजिल्हा बदलीसाठी 11 हजार शिक्षक इच्छुक! दिवाळीनंतर बदल्या

अक्कलकोट तालुक्‍यातील बोरगाव देशमुख येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने बोरगाव -घोळसगाव- वागदरी गावचा संपर्क तुटला आहे. पूर्वा नक्षत्राच्या दमदार पावसामुळे बोरगावसह पंचक्रोशीत दमदार पाऊस झाला आहे. बोरगावचा ओढा गेल्या दोन दिवसांपासून दुथडी भरून वाहत आहे. सलग दोन दिवस बोरगावच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे. पुलाची उंची कमी असल्याने दर पावसाळ्यात हा त्रास प्रवाशांना सोसावा लागतो. अक्कलकोट ते घोळसगाव या रस्त्याची खूपच दुरवस्था झाली आहे असून, मागील कित्येक वर्षांपासून अनेकदा मागणी करूनही हा रस्ता झालेला नाही. त्यातच बोरगावपासून पुढे घोळसगावला जाणाऱ्या रस्त्यावर एक ओढा असून त्याची उंचीही कमी आहे. त्यामुळे ओढ्यातील पाणी सतत पुलावरून वाहत असते. त्यामुळे वाहतूक प्रभावित होत असतो.

हेही वाचा: कुरनूर धरणातून 1800 क्‍युसेकचा विसर्ग ! गावांना सतर्कतेचा इशारा

बोरगाव ग्रामस्थांची 60 टक्के शेती ही ओढ्याच्या पलीकडे असून, त्यांना त्यांच्या शेतीकडे जनावरांना चारापाणी करण्यासाठी जाणे अडचणीचे ठरत आहे. काही जण वाहत्या पाण्यात धोकादायकरीत्या नाइलाजाने पाण्याने वाहणाऱ्या ओढ्याच्या पुलावरून जात आहेत. यामुळे धोका संभवू शकतो. या भागातील प्रत्येक निवडणुकीत गावकऱ्यांच्या या रस्त्यासंदर्भात भावना तीव्र असतात मात्र लोकप्रतिनिधींकडून आश्वासनेच मिळतात आणि रस्ता काही होत नाही. तरी तातडीने हा नवीन रस्ता आणि पूल होणे गरजेचे आहे, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमधून होत आहे.

loading image
go to top