चिक्की, राजगिरा लाडूतून बार्शीतील दाम्पत्याची कोट्यवधींची उलाढाल!

चिक्की, राजगिरा लाडूतून बार्शीतील दाम्पत्याची कोट्यवधींची उलाढाल!
चिक्की, राजगिरा लाडूतून बार्शीतील दाम्पत्याची कोट्यवधींची उलाढाल!
चिक्की, राजगिरा लाडूतून बार्शीतील दाम्पत्याची कोट्यवधींची उलाढाल!sakal
Summary

आज कंपनीमध्ये 20 पुरुष अन्‌ 15 महिला दिवसरात्र काम करीत आहेत. चिक्की व लाडूने पुणे, सातारा, बीड, लातूर, नगर अशा पाच जिल्ह्यांत 300 किलोमीटरपर्यंत बाजारपेठ व्यापली आहे.

बार्शी (सोलापूर) : कौटुंबिक परिस्थिती बिकट, थोरली बहीण आठ वर्षांची, भाऊ दीड वर्षाचा तर स्वत: साडेतीन वर्षांचा असताना वडिलांचे छत्र हरपले आणि दु:खाचा डोंगर कोसळला. पण जिद्द न हरता उद्योजक (Entrepreneur) बनण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेले. आज पाच जिल्ह्यांत चिक्की अन्‌ राजगिरा लाडूची विक्री करून वर्षाला दोन कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. फूड प्रॉडक्‍ट्‌स इंडस्ट्रीजचे चालक धीरज साळुंखे (Dheeraj Salunkhe) यांची ही स्टोरी (Success Story) तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

चिक्की, राजगिरा लाडूतून बार्शीतील दाम्पत्याची कोट्यवधींची उलाढाल!
'मटण-मासे व पैसे वाटून लढवली सांगोला कारखान्याची निवडणूक!'

आपल्या प्रवासाबाबत धीरज साळुंखे यांनी सांगितले, की नोकरी करायची नाही, स्वतःचा व्यवसायच करायचा, अशी मनाशी खूणगाठ बांधली होती. वडिलांच्या नंतर आई सुभद्रा यांनी आम्हा भावंडांचे शिक्षण मोलमजुरी करून पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच घरी आई राजगिऱ्याचे लाडू तयार करीत होती अन्‌ मी सायकलवर जाऊन शहरात विक्री करत होतो. लाडूला मागणी वाढली म्हणून लाडू वाहतुकीसाठी दुचाकी घेतली. 2007 मध्ये दीपालीसोबत विवाह झाला आणि व्यवसायात तिची साथ लाभली. 2010 मध्ये औद्योगिक वसाहत येथे प्लॉट घेतला. फूड प्रॉडक्‍टस्‌चे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केले. पॅकिंग, ऑर्डर, आवक-जावक, असे पूर्ण व्यवस्थापन दीपाली पाहात आहे. आज कंपनीमध्ये 20 पुरुष अन्‌ 15 महिला दिवसरात्र काम करीत असून, लागणारा कच्चा माल सांगली, पुणे येथून मागवत आहे. तयार झालेल्या चिक्की, लाडूने पुणे, सातारा, बीड, लातूर, नगर अशा पाच जिल्ह्यांत 300 किलोमीटरपर्यंत बाजारपेठ व्यापली आहे.

दरमहा 15 लाख रुपयांची राजगिरा लाडू, राजगिरा गुडदानी, मावा, खोबरा, मिक्‍स चिक्कीची विक्री होत असून माल वाहतुकीसाठी दोन आधुनिक ट्रक घेतले आहेत. तर एक कार खरेदी केली. पहिल्या लॉकडाउनमध्ये अडचणी आल्या अन्‌ उत्पादन बंद करायची वेळ आली. पण दुसऱ्यावेळी सर्व सुरळित सुरु ठेवण्यात यशस्वी झालो, असे व्यवस्थापिका दीपाली साळुंखे यांनी स्पष्ट केले.

'कुरकुरीत स्वस्त, आरोग्यास मस्त' असे ब्रीदवाक्‍य घेऊन व्यवसायात उतरलो आणि खवय्यांच्या जिभेची चव ओळखून उत्तम दर्जाची चिक्की आणि राजगिरा लाडू निर्मिती केली. हे पदार्थ खवय्यांच्या पसंतीस पात्र ठरले आहेत. यापुढे शेंगदाणा लाडू, खजूर लाडू, बर्फीचे वेगवेगळे पदार्थ निर्मिती करण्याची तयारी करीत आहोत.

- दीपाली साळुंखे

चिक्की, राजगिरा लाडूतून बार्शीतील दाम्पत्याची कोट्यवधींची उलाढाल!
रखवालदाराने उधळवला टेंभुर्णीतील ATM पळवून नेण्याचा चोरट्यांचा डाव!

ठळक मुद्दे...

  • आज पाच जिल्ह्यांत पदार्थांची विक्री

  • वर्षाला दोन कोटी रुपयांची उलाढाल

  • 20 पुरुष अन्‌ 15 महिलांना दिला रोजगार

  • माल वाहतुकीसाठी घेतले दोन ट्रक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com