विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेसाठी संचालकांची उच्च न्यायालयात धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेसाठी संचालकांची उच्च न्यायालयात धाव
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेसाठी संचालकांची उच्च न्यायालयात धाव

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेसाठी संचालकांची उच्च न्यायालयात धाव

पंढरपूर : पंढरपूर तालुक्‍याचा आर्थिक आणि राजकीय कणा असलेल्या गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या(shri vitthal coperative sugar factory) संचालक मंडळाची मुदत संपून वर्ष लोटले आहे. तरीही कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. संचालक मंडळाची तातडीने निवडणूक प्रक्रिया सुरू करावी, यासाठी विठ्ठलचे संचालक युवराज पाटील(Director yuvraj patil) यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. येत्या १६ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) यावर सुनावणी(hearing) होणार आहे. या सुनावणीकडे विठ्ठलच्या सभासदांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: नाशिकच्या शासकीय कार्यालयांमध्ये होणार चार्जिंग स्टेशन

आर्थिक अडचणींमुळे विठ्ठल कारखाना यावर्षी बंद आहेत. त्यातच मागील. वर्षीच्या गाळप हंगामातील एफआरपीची रक्कम थकीत आहे. शिवाय कामगार आणि तोडणी वाहतूकदारांचेही पैसे थकले आहेत. थकीत रक्कम मिळावी, यासाठी सभासद आणि कामगारांनी थेट जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याच्या गोडाऊनमध्ये शिल्लक असलेली सुमारे ३५ कोटी रुपये किंमतीची १ लाख ९ हजार साखर पोती जप्त केली आहे. दरम्यान, कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपून एक वर्ष लोटून गेले आहे. तरीही निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला नाही. कोरोना संसर्गामुळे सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका काही महिने पुढे ढकलल्या होत्या. मध्यंतरी संसर्ग कमी झाल्यानंतर सहकारी संस्था निवडणूक प्राधिकारण मंडळाने राज्यभरातील अनेक सहकारी साखर कारखान्यासह इतर संस्थांच्या निवडणुका घेतल्या आहेत. मात्र, पंढरपूच्या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर केला नाही.

हेही वाचा: नाशिकच्या शासकीय कार्यालयांमध्ये होणार चार्जिंग स्टेशन

निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा यासाठी प्राधिकरण मंडळाच्या विरोधात कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर दोन वेळा सुनावणी झाली आहे. येत्या १६ जानेवारी रोजी अंतिम सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे विठ्ठलच्या सभासदांचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

विठ्ठल साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपून जवळपास १ वर्ष पूर्ण झाले आहे. कारखाना आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे सध्याच्या संचालक मंडळाला निर्णय घेता येत नाहीत. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. कारखान्याची निवडणूक त्वरीत घेण्यात यावी.

- युवराज पाटील, संचालक श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना

Web Title: In Election Process Of Vitthal Cooperative Sugar Factory Director Has Pettion Filed On Mumbai High Court Yuvraj Patil Pandharpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top