esakal | 'एकटे जाऊ नका मलाही सोबत घेऊन चला!' पतीनंतर पत्नीचेही निधन
sakal

बोलून बातमी शोधा

'एकटे जाऊ नका मलाही सोबत घेऊन चला!' पतीनंतर पत्नीचेही निधन

पती-पत्नी हे सुख- दुःखाचे भागीदार असतात. सोबत तर जगलेच पण मृत्यूही जवळपास सोबतच आल्याची दुःखद घटना बार्शी तालुक्‍यातील मळेगाव येथे घडली.

'एकटे जाऊ नका मलाही सोबत घेऊन चला!' पतीनंतर पत्नीचेही निधन

sakal_logo
By
शांतिलाल काशीद

मळेगाव (सोलापूर) : पती-पत्नी हे सुख- दुःखाचे भागीदार असतात. सोबत तर जगलेच पण मृत्यूही जवळपास सोबतच आल्याची दुःखद घटना बार्शी (Barshi) तालुक्‍यातील मळेगाव येथे घडली. पतीच्या निधनानंतर अवघ्या अठ्ठेचाळीस तासांनंतर पत्नीचे निधन झाले. कमी अंतराने झालेल्या पती-पत्नीच्या निधनामुळे मळेगाव ग्रामस्थांना चटका लागला आहे.

हेही वाचा: पावसाळ्यात उगवणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्या माहीत आहेत का?

मळेगाव येथील रंगनाथ राजाराम आपुने (वय 80) यांच्यावर बार्शी येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी साखरबाई रंगनाथ आपुने (वय 70) तेथेच उपचार घेत होत्या. दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर दोघांनाही डिस्चार्ज देण्यात आला. तीन दिवसांनंतर अचानक रंगनाथ आपुने यांची प्रकृती बिघडल्याने शनिवारी (ता. 4) सायंकाळी त्यांचे निधन झाले. रंगनाथ आपुने यांच्या निधनानंतर आपुने कुटुंबाला व नातेवाइकांना या दुःखातून सावरण्याचा नियतीने वेळच दिला नाही.

हेही वाचा: विधी अभिप्रायानंतरच 'सिद्धेश्‍वर'च्या 'चिमणी'ची पुढील कारवाई!

पतीच्या निधनानंतर "एकटे जाऊ नका मलाही सोबत घेऊन चला' या आकांताने साखरबाई आपुने यांनी रविवारी (ता. 5) सायंकाळी आपला प्राण सोडला. हसत्या - खेळत्या आपुने कुटुंबावर काळाने अचानक झडप घातल्याने मळेगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्‍चात पांडुरंग रंगनाथ आपुने, माणिक रंगनाथ आपुने ही दोन मुले, दोन सुना, चार नातवंडे असा परिवार आहे. रंगनाथ आपुने व साखरबाई आपुने यांनी गरिबीचे चटके सहन करीत कुटुंबाला सावरले, संपूर्ण कुटुंबाला एकसंघ ठेवत उत्तम संस्कार देण्याचे कामही केले. शेती असो वा सुख - दुःखाचे प्रसंग, प्रत्येक ठिकाणी जोडीने जाणारे आपुने दाम्पत्य काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयांचे व नातेवाइकांचे अश्रू मात्र अनावर झाले. पतीच्या निधनानंतर पत्नीची झालेली एक्‍झिट मनाला चटका लावणारी आहे.

loading image
go to top