esakal | चंद्रभागा नदीत एका महिलेसह मुलगा गेला वाहून !
sakal

बोलून बातमी शोधा

Pandharpur

पायल लोंढे ही महिला आज सकाळी येथील नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेली होती. सोबत जय जाधव हा मुलगाही होता. कपडे धुतल्यानंतर ते दोघेही पोहण्यासाठी नदीत उतरले.

चंद्रभागा नदीत एका महिलेसह मुलगा गेला वाहून !

sakal_logo
By
भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : चंद्रभागा नदीवर (Chandrabhaga River) कपडे धुण्यास गेलेल्या एका महिलेसह लहान मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी पंढरपूर शहराच्या पैलतीरावर असलेल्या चिंचोली भोसे गावात घडली आहे. नदीत वाहून गेलेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पायल सुग्रीव लोंढे (वय 18) व जय दत्ता जाधव (वय 12) अशी पाण्यात बुडालेल्या दोघांची नावे आहेत. (In Pandharpur, a woman and a boy drowned in the Chandrabhaga river)

हेही वाचा: विद्यापीठात उभारणार अहिल्यादेवींचा 15 फुटी अश्‍वारूढ पुतळा !

पायल लोंढे ही महिला आज सकाळी येथील नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेली होती. सोबत जय जाधव हा मुलगाही होता. कपडे धुतल्यानंतर ते दोघेही पोहण्यासाठी नदीत उतरले. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. ही घटना आजूबाजूच्या काही लोकांनी पाहिली. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्यांना वाचवता आले नाही. या घटनेनंतर गावातील लोकांनी नदीपात्रात दोघांचाही शोध घेतला असता, ते सापडले नाहीत.

हेही वाचा: अकरावी प्रवेशासाठी द्यावी लागणार सीईटी परीक्षा !

या घटनेनंतर पंढपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी नदीकाठच्या गोपाळपूर, भटुंबरे, शेगाव दुमाला, मुंडेवाडी येथील ग्रामसेवक व पोलिस पाटलांना याबाबत लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले आहे. पंढरपूर शहर व लगतच्या गावांमध्ये चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीकाठच्या नागरिकांनी नदीच्या पाण्यात जाऊ नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी केले आहे.

loading image
go to top