शुगर अन्‌ "बीपी'चे सर्वाधिक रुग्ण कोरोनाचे बळी!

शुगर अन्‌ "बीपी'चे सर्वाधिक रुग्ण कोरोनाचे बळी!
Updated on
Summary

जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयावर रुग्णांचा ताण वाढला आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Corona) लाटेत आतापर्यंत शहर व जिल्ह्यातील 4 हजार 782 को-मॉर्बिड (co morbid) (पूर्वीचा गंभीर आजार) रुग्णांचा मृत्यू (died) झाला आहे. उच्च रक्‍तदाब (बीपी) व डायबेटीस (शुगर) असलेल्या सर्वाधिक 2 हजार 303 रुग्ण कोरोनाचे बळी ठरले. शहर-जिल्ह्यातील ज्येष्ठांचा मृत्यूदर तब्बल 55.7 टक्‍क्‍यांवर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. (In Solapur district, 4782 co morbid patients have died)

शुगर अन्‌ "बीपी'चे सर्वाधिक रुग्ण कोरोनाचे बळी!
मोहिनी भागवत एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट

जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयावर रुग्णांचा ताण वाढला आहे. जिल्ह्यात तीन उपजिल्हा रूग्णालये असून 14 ग्रामीण रुग्णालये आहेत. तसेच 77 प्राथमिक आरोग्य केंद्रे तर 427 उपकेंद्रे आहेत. शहरात 14 नागरी आरोग्य केंद्रे आहेत. त्याठिकाणी कोविड काळात रुग्णांवर उपचार करणे अशक्‍य असल्याने गावोगावी कोविड केअर सेंटर सुरू करावी लागली. तर काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कोविड रुग्णालयेही सुरू झाली.

शुगर अन्‌ "बीपी'चे सर्वाधिक रुग्ण कोरोनाचे बळी!
पाच हजार बालकांमागे एक बालरोगतज्ज्ञ !

जिल्ह्यातील ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर बेडच्या तुटवड्यामुळे अनेकांना वेळेत उपचार मिळाले नाहीत. तर काहींनी लक्षणे असतानाही आजार अंगावर काढला. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. आता मृत्यूदर 2.07 टक्‍के असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण 84.06 टक्‍क्‍यांवर आले आहे. कोरोना काळात को-मॉर्बिड रुग्णांना त्यांचे नित्योपचार घेता आले नाहीत. अनेकांची रोगप्रतिकारक शक्‍ती कमी झाली आणि कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निरीक्षणही आरोग्य विभागाने नोंदविले आहे.

शुगर अन्‌ "बीपी'चे सर्वाधिक रुग्ण कोरोनाचे बळी!
सोलापूर विद्यापीठाची जुलै व ऑगस्टमधील परीक्षाही ऑनलाइनच !

चारवेळा सर्व्हे; तरीही मृत्यूदर रोखण्यात अपयश

शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव थांबावा, को- मॉर्बिड रुग्णांचे मृत्यू कमी व्हावेत या हेतूने महापालिकेने आतापर्यंत चारवेळा घरोघरी जाऊन सर्व्हे केला आहे. तत्कालीन महापालिका आयुक्‍त दीपक तावरे यांच्या काळात एप्रिल 2020 मध्ये सुरू झालेला सर्व्हे अजूनही सुरूच आहे. तरीही शहरातील को-मॉर्बिड मृत्यू कमी झालेले नाहीत. घरोघरी जाऊन सर्व्हे करणाऱ्यांनी लक्षणे असलेल्या संशयितांची माहिती महापालिकेला देऊनही त्यावर काहीच ठोस कार्यवाही झाली नाही. दुसरीकडे काही नागरिकांनीही माहिती लपविल्याचे संबंधित अधिकारी सांगू लागले आहेत. तरीही, महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्याकडून अपेक्षित काम झाले नसल्याची टिका होऊ लागली आहे.

आजारनिहाय कोरोनाचे बळी

आजार मृत्यू

उच्च रक्‍तदाब 717

डायबेटीस 644

बीपी-शुगर 607

बीपी- शुगर- हृदयरोग 435

बीपी- हृदयरोग 431

हृदयरोग 412

किडनीचे आजार 273

दमा 21

लठ्ठपणा 23

एचआयव्ही बाधित 2

60 वर्षांवरील ज्येष्ठ 1317

(In Solapur district, 4782 co morbid patients have died)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com