esakal | विद्यापीठाची जुलै-ऑगस्टमधील परीक्षाही ऑनलाइनच ! प्रॉक्‍टरिंगद्वारे परीक्षार्थींवर वॉच
sakal

बोलून बातमी शोधा

Online Exam

लॅपटॉपवर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्क्रीनवर छायाचित्र दिसते. त्यामुळे त्यांची हालचाल त्यात टिपली जाते. तर मोबाईलवर परीक्षा देणाऱ्यांच्या आयपी ऍड्रेसद्वारे त्यांची हालचाल टिपली जात आहे.

सोलापूर विद्यापीठाची जुलै व ऑगस्टमधील परीक्षाही ऑनलाइनच !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची सध्या ऑनलाइन परीक्षा (Online Exam) सुरू आहे. 23 हजार 960 विद्यार्थ्यांपैकी 95 टक्‍के विद्यार्थ्यांची परीक्षेला उपस्थिती असून, घरबसल्या विद्यार्थ्यांची परीक्षा होत असल्याने त्यांच्या हालचालींवर प्रॉक्‍टरिंगद्वारे (Proctored Exam) लक्ष ठेवले जात आहे. तसेच प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांची (जवळपास 85 हजार विद्यार्थी) परीक्षा 30 जूनपासून घेण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. (Solapur University's July and August exams will also be held online)

हेही वाचा: जिल्ह्यातील कोरोनाबाधित बालकांनी ओलांडला दहा हजारांचा टप्पा !

कोरोनामुळे ऑफलाइन परीक्षा घेणे कठीण असल्याने सोलापूर विद्यापीठाने प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ही परीक्षा विद्यार्थी घरी बसून देत आहेत. हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेत विद्यापीठाने या परीक्षेत प्रॉक्‍टरिंग या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. लॅपटॉपवर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्क्रीनवर छायाचित्र दिसते. त्यामुळे त्यांची हालचाल त्यात टिपली जाते. तर मोबाईलवर परीक्षा देणाऱ्यांच्या आयपी ऍड्रेसद्वारे त्यांची हालचाल टिपली जात आहे. तसेच आयपी ऍड्रेसमुळे किती विद्यार्थी सामूहिकपणे परीक्षा देत आहेत, याचीही माहिती विद्यापीठाला मिळत आहे. दरम्यान, सर्वच विद्यार्थ्यांवर प्रॉक्‍टरिंगद्वारे वॉच ठेवणे कठीण असल्याने संशयित विद्यार्थ्यांची पडताळणी त्या तंत्रज्ञानाद्वारे केली जाणार आहे. 50 गुणांच्या परीक्षेसाठी एक तासाचा वेळ देण्यात आला असून परीक्षेला विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती आहे.

हेही वाचा: का होतो "म्युकरमायकोसिस'? जिल्ह्यात 157 पैकी सात रुग्णांचा मृत्यू

प्रथम वर्षाच्या परीक्षा आणि आगामी परीक्षांचे नियोजन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस व प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. आता सुरू असलेल्या परीक्षेला जवळपास 95 टक्‍के विद्यार्थ्यांची उपस्थिती असून 23 मेपर्यंत परीक्षा आहे.

- विकास कदम, संचालक, परीक्षा व मूल्यमापन विभाग, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

जुलै-ऑगस्टमधील परीक्षाही ऑनलाइनच

प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांची (जवळपास 85 हजार विद्यार्थी) परीक्षा 30 जूनपासून घेण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात द्वितीय व अंतिम वर्षातील तर शेवटच्या टप्प्यात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने नियोजन केले आहे. कोरोनाचा धोका अजूनही टळला नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत ही परीक्षा ऑनलाइनच घेण्याचा निर्णय पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने घेतला आहे. त्यासंदर्भात अभ्यास मंडळाच्या बैठकीत एकमत झाल्याचेही परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले.

loading image
go to top