जिल्ह्यात तीन हजार रेमडेसिव्हिर पडूनच ! साडेसतरा हजार बेड शिल्लक

सोलापूर जिल्ह्यात तीन हजार रेमडेसिव्हिर व सतरा हजार बेड शिल्लक आहेत
Remdesivir
RemdesivirEsakal

रेमडेसिव्हिरच्या अतिवापराने उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना अन्य त्रास सुरू झाल्याच्या चर्चेतून इंजेक्‍शनची मागणी घटल्याचे चित्र आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेच्या सुरवातीला रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिव्हिरचा (Remdesivir) मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला. मात्र, रेमडेसिव्हिरच्या अतिवापराने उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना अन्य त्रास सुरू झाल्याच्या चर्चेतून इंजेक्‍शनची मागणी घटल्याचे चित्र आहे. मागील तीन-चार दिवसांपासून जिल्हा प्रशासनाकडे तीन हजार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन पडूनच असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. (In Solapur district, there are three thousand remdesivir and seventeen thousand beds left)

Remdesivir
आरक्षणामुळे "एमपीएससी'च्या 24 परीक्षांचा तिढा ! संयुक्‍त पूर्वपरीक्षा लांबणार

शहर- जिल्ह्यातील आतापर्यंत एक लाख 52 हजार 125 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी एक लाख 42 हजार 410 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यातील काहींना विशेषत: मधुमेह असलेल्यांना म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या आजाराला सामोरे जावे लागत आहे. तर काहींना शुगरसह अन्य त्रास सुरू झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, तीव्र व अतितीव्र लक्षणे असलेल्यांना कोव्हिड हॉस्पिटलच्या माध्यमातून उपचार दिले जात आहेत. तर त्यातील श्‍वसनाचा त्रास होणाऱ्या तथा ऑक्‍सिजन कमी झालेल्यांना ऑक्‍सिजन बेड उपलब्ध करून दिला जात आहे. आयसीयू, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या तीव्र व अतितीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना दुसऱ्या लाटेत रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. काही रुग्णांच्या नातेवाइकांनी आमच्या रुग्णाला रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन द्या, अशी मागणी डॉक्‍टरांकडे केली. गरज नसतानाही अनेकांना हे इंजेक्‍शन देण्यात आल्याचेही ऐकण्यात आले. मात्र, आता रुग्णांचे नातेवाईकच म्हणत आहेत, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन नको, असाही अनुभव जिल्हा प्रशासनाला आला.

Remdesivir
शहरातील प्रश्‍नांवर प्रणिती शिंदे व संजय शिंदे पुन्हा आमने-सामने !

17564 बेड्‌स शिल्लक

शहर-जिल्ह्यात एकूण 26 हजार 912 बेड्‌स असून त्यातील 17 हजार 564 बेड्‌स सध्या शिल्लक आहेत. त्यात ऑक्‍सिजनचे दोन हजार 973 बेड, व्हेंटिलेटरचे 329 तर 380 आयसीयू बेड आणि 15 हजार 817 साध्या बेड्‌सचा समावेश आहे. शहरातील संसर्ग आटोक्‍यात आला असून सद्य:स्थितीत 425 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 80 हून अधिक रुग्ण सिंहगड कोव्हिड केअर सेंटरमध्ये असून उर्वरित रुग्ण कोव्हिड हॉस्पिटलच्या माध्यमातून उपचार घेत आहेत. ग्रामीण भागात सध्या पाच हजार 292 रुग्ण उपचार घेत असून त्यातील दीड हजारापर्यंत रुग्ण कोव्हिड केअर सेंटरमध्ये तर उर्वरित रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत. सध्या एक हजार 731 रुग्ण ऑक्‍सिजन बेडवर तर 204 रुग्ण व्हेंटिलेटरवर आणि 818 रुग्ण आयसीयूत आहेत.

20 टनाने ऑक्‍सिजनची मागणी घटली

तीव्र व अतितीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या घटल्याने ऑक्‍सिजन मागणीत घट झाली आहे. दररोज 51 टन लागणारा ऑक्‍सिजन आता 31 टनावर आला. तरीही, दुसरी लाट अजूनही संपली नसून तिसऱ्या लाटेचीही शक्‍यता आहे. त्यामुळे प्रशासनाने 51 टनांची मागणी कायम ठेवली असून आता गरजेएवढाच ऑक्‍सिजन घेतला जात असल्याचेही वाघमारे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com