50 हजार महिला विडी कामगारांचे ठिय्या आंदोलन

विडी कामगार
विडी कामगारe sakal
Updated on

सोलापूर : राज्यातील साधारणतः ४ लाख विडी कामगारांच्या रोजगारावर एका व्यक्तीने दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे संक्रात आली आहे. म्हणून रोजगार वाचविण्यासाठी सोलापुरातील ५० हजार महिला विडी कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता विडी उद्योगावरील संकट परतवून लावण्यासाठी लढ्याच्या मैदानात उतरल्या आहेत. रखरखते ऊन असतानासुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (district collector office solapur) लाल झेंडा खांद्यावर घेऊन पोट तिडकीने आमचा रोजगार वाचवा अशा आर्तहाकेतून गगनभेदी आवाजात घोषणा दिल्या. यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून संपूर्ण सोलापूर शहर आणि गोदुताई वसाहतीतील महिला विडी कामगार पूनम गेट येथे जमा झाल्या होत्या. (in solapur, labour leader narasayya adam agitated for various demands of VD workers)

विडी कामगार
कृष्णा निवडणूक रणांगण; विद्यमान 14 संचालक पुन्‍हा रिंगणात

समाज कल्याण पासून ते ख्रिस्तीसेवा मंडळ तसेच पूनम गेट ते सिद्धेश्वर हायस्कूल असा संपूर्ण परिसर विडी कामगारांनी व्यापून टाकले. कोरोनाने मरण्यापेक्षा न्याय हक्कासाठी आणि रोजगारासाठी जर मरण आले ते वीर मरण समजू असे स्फुरण विडी कामगारांमध्ये दिसून आले. हि विडी कामगारांची वास्तविकता आणि दाहकता राज्य सरकारने लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयात विडी कामगारांच्या बाजूने सकारात्मक प्रतिज्ञापत्र दाखल करून विडी उद्योग व रोजगार वाचवावे. अन्यथा आगामी काळात याहून उग्र स्वरूपाचे अर्थातच १ लाख विडी कामगार कुटुंबासह बेमुदत धरणे आंदोलन करतील असा जाहीर इशारा आंदोलकांना संबोधित करताना दिले. तसेच सभेला संबोधित करताना पोलीस प्रशासनाने हजारोंच्या संख्येने आलेल्या महिला विडी कामगारांना हुसकले नंतर सर्वात शेवटी नेते व प्रमुख शेकडो कार्यकर्त्यांना बळजबरीने ताब्यात घेतले याचा जळजळीत निषेध व्यक्त केले. बुधवार (ता. २३) जून २०२१ रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स संलग्न लाल बावटा विडी कामगार युनियनच्या वतीने मा. जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) व सिटूचे राज्य महासचिव अड. एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली ५० हजार विडी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी बोलताना आडम मास्तर म्हणाले कि, धूम्रपानामुळे कोरोना होण्याचा धोका जास्त आहे, असा तर्क लावून एका याचिका कर्त्याने मे. मुबंई उच्च न्यायालयात विडी विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात यावी, यासाठी २० एप्रिल २१ रोजी जनहित याचिका क्र. १०२७६/२०२१ ने दाखल केली आहे. या याचिकेवर 22 एप्रिल 2021 रोजी पहिली सुनावणी झाली त्यानंतर 3 मे रोजी दि. 20 मे, 27 मे, 2 जुन, 8 जुन, 15 जुन, 16 जुन, इत्यादी तारखास मुंबई उच्च न्यायालय सुनावणी झाली.

यात महाराष्ट्र राज्य सरकारने बाजू मांडताना निसर्ग न्याय तत्वाचा वापर करुन राज्यातील ४ लाख विडी कामगारांवर येणाऱ्या उपासमारीचा विचार ही केला पाहिजे. ज्यावेळी याची माहिती सिटू प्रणित लालबावटा विडी कामगार युनियनला कळाली. तेव्हापासून मा. मुख्यमंत्री महोदयां पासून सर्वच संबंधित मा. मंत्री व मा. प्रशासकीय अधिकारी यांना प्रत्यक्ष फोनवर बोलून व इमेल ने निवेदने पाठवून योग्य भूमिका घेण्याची विनंती केली आहे. परंतू प्रत्यक्षात तसे झाल्याचे दिसत नाही. उलट महाराष्ट्र शासनाच्या महाधिवक्ता यांनी याचिकाकर्त्याला पुरक अशी बाजू मांडली आहे. यामुळे राज्यातील विडी कामगारांवर बेरोजगारीची कुराड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोना पेक्षा ही भयंकर अशी उपासमारीची वेळ त्यांच्यावर येणार आहे. याप्रकरणी पाच वेळा सुनावणी झाली आहे. सरकारतर्फे टाटा इन्स्टिट्यूट मार्फत आलेल्या व अहवालाच्या आधारे २५ जून रोजी मुख्य न्यायाधीश अंतिम आदेश देणार आहेत. याबाबत २४ जून पर्यंत राज्य सरकारची बाजू ऐकली जाणार आहे. त्याआधी राज्य सरकारचे म्हणणे सादर करणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मुदत दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील ४ लाख विडी कामगारांचे रोजगार वाचवण्यासाठी कामगारांची बाजू भक्कमपणे मांडली पाहिजे. तरच विडी उद्योग व विडी कामगारांचा रोजगार शाबूत राहील. त्यानंतर आंदोलनाची भूमिका कॉ. एम.एच.शेख म्हणाले कि, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकाच्या बाजूने निकाल जाहीर झाला तर राज्यातील ४ लाख विडी कामगार क्षणार्धात भिकेला लागतील. हा संभाव्य धोका असून याकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. उलटपक्षी धूम्रपान केल्यास कोरोनाचा संसर्ग होतच असे स्पष्ट वैज्ञानिकांचे मत नाही. याचेही अध्ययन राज्य सरकारच्या अधिवक्ताकडून केला गेला नाही. ही खेदाची बाब आहे.

विडी कामगार
अवैध वाळू साठ्यावर सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

यावेळी व्यासपीठावर कॉ. नसीमा शेख, नगरसेविका कामिनिताई आडम, सुनंदाताई बल्ला, सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख (मेजर), कुर्मय्या म्हेत्रे, मुरलीधर सुंचू, फातिमा बेग, रंगप्पा मरेड्डी, म.हनीफ सातखेड, सलीम मुल्ला,अनिल वासम, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल वासम यांनी केले.

सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी विल्यम ससाणे, बापू साबळे, दाउद शेख, वासिम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, अप्पाशा चांगले, हसन शेख, रफिक काझी, अशोक बल्ला, अकिल शेख, नरेश दुगाने, विरेद्र पद्मा, दीपक निकंबे, बाळकृष्ण मल्याळ, विनायक भैरी, श्रीनिवास गड्डम, बालाजी गुंडे, अंबादास बिंगी, किशोर गुंडला, नागेश म्हेत्रे, शाम आडम, मल्लेशम कारमपुरी, दत्ता चव्हाण, विजय हरसुरे, दिनेश बडगू, नरेश गुल्लापल्ली ,बजरंग गायकवाड, भारत पाथरूट, शिवा श्रीराम, अंबाजी दोन्तुल प्रवीण आडम, महादेव घोडके, अनिल घोडके, प्रकाश कुऱ्हाडकर आदींनी परिश्रम घेतले. (in solapur, labour leader narasayya adam agitated for various demands of VD workers)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com