
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार ०८६ शेतकऱ्यांनी ४७ हजार ११७ हेक्टर कांदा पिकाच्या क्षेत्राचा बोगस विमा भरल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांनी फळबाग नसतानाही एक हजार ९०० जणांनी बोगस विमा उतरविल्याचे दिसून आले आहे. मात्र, याबाबतचे क्षेत्र निश्चित होऊ शकले नाही. या बोगस विमा भरलेल्या क्षेत्राच्या विम्यापोटी संबंधित शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम राज्य सरकारकडून जप्त केली जाणार आहे.