esakal | आजपासून आदिशक्तीचा जागर
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

आजपासून आदिशक्तीचा जागर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर : घटस्थापनेचा मुहूर्त साधत उद्यापासून राज्यातील प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली होत आहेत. तुळजापूर (Tuljapur), कोल्हापूर (Kolhapur), वणी (Vani) आदी मंदिरांमध्ये नवरात्राची तयारी पूर्ण झाली आहे. भाविक याचि देहा, याची डोळा' आराध्य दैवतांची मूर्ती डोळ्यात साठविण्यास उत्सुक आहेत. तुळजापूरमध्ये मंदिरात परंपरेनुसार धार्मिक विधी होतील.

हेही वाचा: स्थलांतर केल्यानंतर शस्त्रक्रियांचा टाका घट्ट

तुळजाभवानी मातेची शेजघरातील निद्रिस्त मूर्ती गुरुवारी (ता. ७) सिंहासनावर अधिष्ठित केल्यानंतर अभिषेक होईल. दुपारी वाराला घटस्थापना होणार आहे. तसेच श्री अंबाबाई आणि जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावे लागेल.

loading image
go to top