इम्युनिटी वाढवण्यासाठी गुळवेल, गवती चहा, काळ्या हळदीची वाढली मागणी ! जाणून घ्या यांचे गुणधर्म

इम्युनिटी वाढवण्यासाठी गुळवेल, गवती चहा व काळ्या हळदीची वाढली मागणी
Ayurvedic Nursery
Ayurvedic NurseryEsakal
Updated on

वैराग (सोलापूर) : रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) चांगली ठेवण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पती (Ayurvedic) तसेच गुणकारी वृक्षांचा फायदा होत आहे. या गुणकारी रोपांची लागवड करण्यास नागरिकांची पसंती वाढत असल्याचे मत नगर येथील प्रसिद्ध वैद्यकीय उपचार तज्ज्ञ डॉ. परेश विभूते (Dr. Paresh Vibhute) यांनी व्यक्त केले. वैराग (ता. बार्शी) येथे ते बोलत होते. (Increased demand for mulberry, herbal tea and black turmeric to boost immunity)

सध्या ग्रामीण भागात अशा वृक्षांना मागणी वाढली आहे. शहरातील नर्सरीमध्ये मिळणाऱ्या गवती चहा, गुळवेल, काळी हळद, तुळस, अश्वगंधा यांची मागणी वाढली आहे.

Ayurvedic Nursery
जिल्ह्यासाठी मिळाले लसीचे 12 हजार डोस ! शहर व ग्रामीणसाठी 'असे' झाले नियोजन

वैराग भागातील ग्रामीण ठिकाणी ऍग्रो नर्सरी व अन्य झाडांची लागवड करणाऱ्या नर्सरींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. एरव्ही पावसाळ्यात झाडे लावण्याकरिता नागरिक नर्सरीकडे वळतात. इतर कालावधीत झाडांच्या नर्सरीकडे दुर्लक्ष केले जाते. मागील एक वर्षापासून कोरोनाच्या या संकटकाळात इम्युनिटी वाढविणाऱ्या रोपांची मागणी वाढली आहे. यासोबतच अन्य पर्यायी वनस्पतींची मागणी आणि विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामध्ये गवती चहा, काळी हळद, गुळवेल, तुळस, अश्वगंधा, अद्रक अशा रोपांची लागवड घरोघरी केली जात आहे. तसेच या औषधींचे सेवनही केले जात आहे.

इम्युनिटी वाढवणारी झाडे : गवती चहा, काळी हळद, गुळवेल, इन्सुलिन, सफेद मुसळी, मोहगुणी सीड इत्यादी.

ऑक्‍सिजन देणारी झाडे : आरेका फार्म, कडुनिंब, बांबू, युजा, मोरपंखी, ऍस्प्रा, ख्रिसमस ट्री ही ऑक्‍सिजन वाढीस उपयुक्त असतात.

Ayurvedic Nursery
"ओन्ली बेड अँड हॉस्पिटल !' व्हॉट्‌सऍप ग्रुपने वाचवले अनेक कोरोना रुग्णांचे प्राण

रोपे व त्यांचे गुणधर्म...

  • तुळस : जीवनसत्त्व अ, ब व अनेक पोषक तत्त्वे मिळतात. तुळशीला जैव प्रतिरोधी मानले जाते. श्वास, दमा, फुफ्फुसाचे रोग यावर गुणकारी.

  • गुळवेल : गुळवेलच्या पानांमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फरस हे घटक आढळतात. कावीळसारख्या आजारात गुळवेलचा वापर केला जातो. काढा सर्वांसाठी परिणामकारक असतो.

  • अश्वगंधा : शरीरातील प्रतिकारशक्ती चांगली करण्यासाठी व झोप अधिक येण्यासाठी अश्वगंधा उपयुक्त ठरते.

  • गवती चहा : गवती चहा घेतल्याने मानसिक ताण- तणावातून आराम मिळतो. शांत झोप येण्यासाठी गवती चहा फायदेशीर आहे. डोकेदुखी, अंगदुखी यासाठी तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गवती चहा उपयुक्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

6,000 Litres of Fuel a Year! Know the Official Facilities for Solapur ZP President
Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Marathi News Esakal
www.esakal.com