शहरात रुग्ण बरे होण्याचे वाढले प्रमाण! आज 916 रिपोर्टमध्ये 29 पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू 

3Copy_20of_20coronavirus_test_20positive_21.jpg
3Copy_20of_20coronavirus_test_20positive_21.jpg
Updated on

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या आता हळूहळू आटोक्‍यात येऊ लागली आहे. आज 916 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यामध्ये केवळ 29 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शेळगी परिसरातील कुमारस्वामी नगरातील 59 वर्षीय महिलेचा, तर जुळे सोलापुरातील बसवराज नगरातील 58 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

ठळक बाबी... 

  • शहरातील 59 हजार 345 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले सहा हजार 411 पॉझिटिव्ह 
  • आज 916 अहवालात 29 जणांचे रिपोर्ट निघाले पॉझिटिव्ह 
  • कुमारस्वामी नगर (शेळगी), बसवराज नगर (जुळे सोलापूर) येथील दोघांचा मृत्यू 
  • शहरातील मृतांची संख्या 405 झाली; आज 19 रुग्ण बरे होऊन घरी परतले 
  •  

सुराणा मार्केट, कर्णिक नगर, स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), आयएमपी ग्रीनजवळ (सैफूल), वसंत विहार (अक्‍कलकोट रोड), सुंदरम नगर, योगीनाथ सोसायटी, महालक्ष्मी सोसायटी (शेळगी), न्यू जगजीवनराम झोपडपट्टी (मोदीखाना), सनसिटी बि-विंग (दमाणी नगर), विनस अपार्टमेंट (आसरा चौक), बसवराज नगर, रेणुका नगर (जुळे सोलापूर), पाम हौसिंग सोसायटीजवळ, गीता नगर (गोविंदश्री मंगल कार्यालयाजवळ), थोबडे वस्ती (बसस्टॉपजवळ), एसआरपी कॅम्प (वियजपूर रोड), देगाव, सोलापूर ब्लड बॅंकजवळ (रेल्वे लाईन), भवानी पेठ येथे आज नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. 

आयुक्‍त पी. शिवशंकर यांचे ठोस नियोजन 
शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच नव्याने रुजू झालेले आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी ठोस नियोजन करीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश मिळविले आहे. त्यांनी खासगी दवाखान्यांना दिलेले सक्‍त आदेश, कामचुकार कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई, पोलिस प्रशासनाची मदत, नगरसेवकांच्या पुढाकारातून ऍन्टीजेन टेस्टवर भर, घरोघरी जावून को-मॉर्बिड रुग्णांचा केलेला सर्व्हे, यामुळे शहरातील संसर्ग कमी झाला आहे. दुसरीकडे नागरिकांनीही स्वंयशिस्त पाळली असून मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेला प्राधान्य दिल्यानेही ससंर्ग कमी होण्यास मदत झाली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com