कोरोना लस आता घरोघरी! एकही डोस न घेतलेल्यांची यादी तयार

कोरोना लस आता घरोघरी! एकही डोस न घेतलेल्यांची यादी तयार
कोरोना लस
कोरोना लस sakal
Updated on
Summary

कोरोनावरील प्रतिबंधित लसीतून विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.

सोलापूर : कोरोनावरील (Covid-19) प्रतिबंधित लसीतून (Covid Vaccine) विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. सोलापूर (Solapur) शहरातील दोन लाख 64 हजार 781 तर ग्रामीणमधील आठ लाख 90 हजार 146 व्यक्‍तींनी अजून लसीचा एकही डोस घेतलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर आता 'हर घर दस्तक' उपक्रमाअंतर्गत संबंधितांना घरोघरी लस टोचली जाणार आहे. महापालिका व जिल्हा आरोग्य विभागाने हा उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.

कोरोना लस
स्वस्त होणार पेट्रोल? मुख्यमंत्र्यांची अजितदादांसोबत आज बैठक

जिल्ह्यातील 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचली जात आहे. कोवॅक्‍सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा तर कोविशिल्ड लस टोचल्यानंतर दुसरा डोस 84 दिवसांनी घेणे आवश्‍यक आहे. लसीकरणाचे चार टप्पे करण्यात आले असून त्यात पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, 18 ते 44 आणि 45 वर्षांवरील असे टप्पे आहेत. चिंतेची बाब म्हणजे, 18 ते 44 वयोगटातील सर्वाधिक तरुण अद्याप लसीकरणापासून दूर असून ते वास्तव 'सकाळ'च्या माध्यमातून 'पुनर्जन्माचे दोन डोस'ने समोर आणले होते. त्यानंतर घरोघरी लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता शहरातील नागरी आरोग्य केंद्रनिहाय व्यक्‍तींची यादी तयार करून त्यांना लस टोचली जाणार आहे. तर ग्रामीणमधील उत्तर सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, माळशिरस, बार्शी व पंढरपूर तालुक्‍यातील वाड्या- वस्त्यांवरही लसीकरण केले जाणार आहे. पहिला डोस 100 टक्‍के व्यक्‍तींनी घेतल्यानंतर दुसरा डोस न टोचलेल्यांचेही अशा प्रकारेच लसीकरण करण्याचे नियोजन आहे.

तालुकानिहाय लसीकरणाची स्थिती...

  • तालुका : एकही डोस न घेतलेले

  • उत्तर सोलापूर : 26,873

  • दक्षिण सोलापूर : 52,258

  • मोहोळ : 84,782

  • मंगळवेढा : 77,396

  • सांगोला : 1,02,812

  • माढा : 81,527

  • अक्‍कलकोट : 53,063

  • करमाळा : 72,171

  • माळशिरस : 1,36,585

  • बार्शी : 80,038

  • पंढरपूर : 1,22,641

कोरोना लस
पुढील परीक्षा ऑफलाइनच! दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांचीच परीक्षा?

जिल्ह्याला 39 लाख डोसची गरज

जिल्ह्यातील 11 लाख 54 हजार 927 व्यक्‍तींनी अजूनपर्यंत लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तर दुसरीकडे 15 लाख 61 हजार 739 व्यक्‍तींनी दुसरा डोस घ्यायचा आहे. त्यासाठी जिल्ह्याला आणखी 38 लाख 71 हजार 593 डोस लागणार आहेत. सध्या जिल्ह्यासाठी दोन लाख डोस शिल्लक असून एकही डोस न घेतलेल्यांना प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी 'हर घर दस्तक' हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती लसीकरणाचे जिल्हा समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur rural police
jewellery theft
Zero Tolerance: Maharashtra IMA Refuses to Support Doctors Implicated in NEET Scam
Sugarcane Farmers Demand Immediate Clearance of ₹130 Crore Pending Bills
Marathi News Esakal
www.esakal.com