esakal | मंगळवेढ्यातील अपात्र लाभार्थींनी लाटले "प्रधानमंत्री किसान'चे दोन कोटी ! तहसीलदारांनी धाडल्या नोटिसा 
sakal

बोलून बातमी शोधा

PM_kisan

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी तालुक्‍यातील अनेक अपात्र लाभार्थी शेतकरी आढळून आले आहेत. यात शासकीय नोकरीत असलेल्या व आयकर भरणाऱ्या लाभार्थींचाही समावेश आहे. 2240 अपात्र शेतकऱ्यांना दोन कोटी रक्कम शासकीय खात्यावर जमा करण्याच्या नोटिसा तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी बजावल्या आहेत.

मंगळवेढ्यातील अपात्र लाभार्थींनी लाटले "प्रधानमंत्री किसान'चे दोन कोटी ! तहसीलदारांनी धाडल्या नोटिसा 

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी तालुक्‍यातील अनेक अपात्र लाभार्थी शेतकरी आढळून आले आहेत. यात शासकीय नोकरीत असलेल्या व आयकर भरणाऱ्या लाभार्थींचाही समावेश आहे. 2240 अपात्र शेतकऱ्यांना दोन कोटी रक्कम शासकीय खात्यावर जमा करण्याच्या नोटिसा तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी बजावल्या आहेत. 

शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात. ठराविक टप्प्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होते. यासाठी ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. योजना जाहीर करतानाच त्याचे लाभार्थी कोण असतील, हेही जाहीर केले होते. तरीही अनेकांनी अपात्र असतानाही नोंदणी केली. विशेष म्हणजे त्यांच्या खात्यावर पैसेही जमा झाले. आता योजनेच्या पुढील टप्प्यातील तरतुदीनुसार लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. त्यामध्ये अनेकांचे पितळ उघड पडत आहे. 

अटींची पूर्तता न करणाऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतल्याचे पडताळणीत आढळून आले. अपात्र लाभार्थींना योजनेच्या यादीतून हटविण्यात आले आहे. आतापर्यंत त्यांच्या खात्यावर वर्ग झालेले पैसेही परत घेतले जाणार आहेत. तालुक्‍यातील 40 हजार 71 लाभार्थ्यांमध्ये 730 बोगस लाभार्थ्यांच्या खात्यांत 71 लाख 90 हजार तर विविध कारणांनी अपात्र झालेल्या 1510 लाभार्थ्यांकडून 1 कोटी 27 लाख वसूल करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. विशेष म्हणजे मेटकरवाडी या गावात एकही लाभार्थी बोगस आढळून आला नाही. 

गावनिहाय अपात्र लाभार्थी पुढीलप्रमाणे 
अकोला 40, आंधळगाव 25, आरळी 31, आसबेवाडी 3, बावची 20, बठाण 3, भालेवाडी 7, भाळवणी 35, भोसे 43, बोराळे 183, ब्रह्मपुरी 12, चिक्कळगी 33, देगाव 8, धर्मगाव 12, ढवळस 14, डिकसळ 12, डोणज 63, डोंगरगाव 4, फटेवाडी 5, गणेशवाडी 26, घरनिकी 36, गोणेवाडी 33, गुंजेगाव 73, हाजापूर 9, हिवरगाव 7, हुलजंती 33, हुन्नूर 31, जालिहाळ 4, जंगलगी 15, जित्ती 19, जुनोनी 38, कचरेवाडी 10, कागष्ट 14, कर्जाळ 4, कात्राळ 3, खडकी 8, खवे 31, खोमनाळ 36, खुपसंगी 22, लमाणतांडा 9, लवंगी 59, लक्ष्मी दहिवडी 30, लेंडवे चिंचाळे 8, लोणार 14, माचणूर 63, महमदाबाद हू. 53, महमदाबाद शे. 8, माळेवाडी 36, मल्लेवाडी 4, मानेवाडी 7, मंगळवेढा 104, मारापूर 82, मरवडे 60, मारोळी 9, मुढवी 6, मुंढेवाडी 14, नंदेश्वर 13, नंदूर 31, निंबोणी 57, पडोळकरवाडी 19, पाठखळ 45, पौट 40, रड्डे 13, रहाटेवाडी 39, रेवेवाडी 12, सलगर बु 47, सलगर खु 17, शेलेवाडी 38, शिरसी 25, शिरनांदगी 11, शिवणगी 16, सिद्धापूर 34, सिद्धनकेरी 10, सोड्डी 20, तळसंगी 64, तामदर्डी 42, तांडोर 18, उचेठाण 5, येड्राव 29, येळगी 13. 

याबाबत तहसीलदार स्वप्नील रावडे म्हणाले, आयकर भरणाऱ्यांनी योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना मिळालेले हप्ते वसूल केले जात आहेत. अनुदान मिळालेल्यांनी हप्त्याची रक्कम भारतीय स्टेट बॅंक (आयएफएससी कोड Sbin0007156, खाते क्र. 39780489796) यामध्ये जमा करून कारवाई टाळावी. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top