
सोलापूर/पंढरपूर : पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी वारीचा सोहळा ६ जुलैला पंढरपुरात रंगणार आहे. त्यासाठी राज्यभरातून १३ ते १५ लाख भाविक पंढरपूरमध्ये असणार आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रभागेत वारकऱ्यांना स्नान करता यावे, वाळवंट परिसरात पाण्याचा विसर्ग जास्त राहू नये, यासाठी आता उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी पूर्णत: बंद करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) सकाळपर्यंत चंद्रभागेच्या वाळवंट परिसरातील विसर्ग कमी होणार आहे.