इनोव्हेटिव्ह स्कूलच्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे वाचतील तब्बल ११ अब्ज रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Innovative school project Farmers will save 11 billion

इनोव्हेटिव्ह स्कूलच्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे वाचतील तब्बल ११ अब्ज रुपये

उ सोलापूर : कंपोस्ट खताच्या खड्ड्यातील उष्णतेमुळे खताचे मंद ज्वलन होऊन राख झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे एका वर्षात अकरा अब्ज रुपयांचे नुकसान होते. शेजबाभूळगाव (ता. मोहोळ) येथील जिल्हा परिषद शाळा व अंकोलीच्या इनोव्हेटिव्ह स्कूलच्या विद्यार्थ्यानी केलेल्या एका छोट्या संशोधन प्रकल्पामुळे हे नुकसान थांबेल. शिवाय जवळपास ४५ कोटी रुपयांचे लाकूड वाचेल.

जागतिक तापमानवाढ रोखण्याच्या प्रयत्नात हा प्रकल्प खारीचा वाटा उचलेल. हा संशोधन प्रकल्प इनोव्हेटिव्ह स्कूल अंकोलीमध्ये करण्यात आला आहे. कंपोस्ट खताच्या खड्ड्यातील उष्णतेचा उपयोग करून पाणी गरम करण्याची कल्पना शेजबाभूळगाव शाळेतील सातवीत शिकणाऱ्या हर्षवर्धन इंगळे याला सुचली. त्याच्यासह सुमित शिंदे, शिवम भालेराव, पृथ्वीराज लाळे, समर्थ भालेराव, मोहंमद तांबोळी या शेजबाभूळगाव व इनोव्हेटिव्ह स्कूलमधील विद्यार्थ्यानी पैगंबर तांबोळी व रियाज तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली यावर संशोधन सुरु केले. अरुण देशपांडे यांच्या विज्ञानग्रामाच्या सहकार्याने हे संशोधन सुरु आहे. तीन वर्षांच्या संशोधनानंतर या विद्यार्थानी पूर्ण केलेल्या प्रकल्पाचे डाएट, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, सर फाउंडेशन व प्रिसिजन फाउंडेशनचा आविष्कार उपक्रम, गुजरातच्या हनी बी नेटवर्कचा डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इग्नाईट ॲवार्ड, तसेच केंद्र सरकारच्या बालविज्ञान परिषद व इन्स्पायर ॲवार्डमध्ये सादरीकरण केले. या सर्व स्पर्धामध्ये संशोधन प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली.

पाणी गरम करणे हे एकच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुरु केलेल्या प्रकल्पातून एका वर्षात चांगल्या प्रतिचे कंपोस्ट खत मिळविण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होतो हे समजले. कंपोस्ट खताच्या खड्ड्यात ३२ ते ७० अंश सेल्सियश इतके तापमान असते. कंपोस्ट खताचे विघटन होताना उष्णता निर्माण होते. यावर नियंत्रण न ठेवल्यास जवळपास निम्म्या खताची राख होते. विद्यार्थ्यानी कंपोस्ट खताच्या खड्ड्यातून पाऊण इंच व्यासाच्या पाईपमधून पाणी घेऊन ते गरम करण्याचा प्रयोग यशस्वी केला. या पाईपमधील पाण्यामुळे खड्ड्यातील उष्णता नियंत्रित करता येते हेही लक्षात आले.

Web Title: Innovative School Project Farmers Will Save 11 Billion Solapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..