

A Thoughtful Gesture: 300 Guests Receive Dnyaneshwari Instead of Sarees
sakal
अंजनगाव खे. : विवाह संस्कृतीत आहेराला मोठे महत्त्व असते. अनेकदा आहेरावरून रुसवे-फुगवे, मानापमानाचे प्रसंग घडतात. या प्रथांना छेद देत, विठ्ठलवाडी (ता. माढा) येथील कदम परिवाराने मुलगा नितेश आणि रोहिणी यांच्या विवाहात साड्यांऐवजी ३०० महिलांना ज्ञानेश्वरी ग्रंथ आहेर म्हणून देत, ‘ज्ञानरूपी’ भेट देत एकोप्याचा संदेश दिला आहे. साधारण ३० हजार रुपयांचा ग्रंथरुपी आहेर केला.