Instead of Solapur airport should at Pandharpur demanded BJP leader Santosh Patil
Instead of Solapur airport should at Pandharpur demanded BJP leader Santosh Patilsakal

सोलापुर ऐवजी पंढरपुरला विमान तळ व्हावे; भाजपाचे नेते संतोष पाटील यांची मागणी

सोलापूर येथे विमानतळ करण्यासाठी विमान प्राधिकरणाने बोरामणी परिसरात जमिनी संपादित केल्या आहेत. या जमिनी संपादित करून जवळपास दहा वर्षे उलटून गेली
Published on

मोहोळ : सोलापुर जिल्ह्यातील विमानतळ सोलापूर ऐवजी जगात आणि देशात प्रसिद्ध असणाऱ्या व दक्षीणेची काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूर येथे करण्याची मागणी भाजपचे राज्याचे नेते संतोष पाटील यांनी केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. सोलापूर येथे विमानतळ करण्यासाठी विमान प्राधिकरणाने बोरामणी परिसरात जमिनी संपादित केल्या आहेत. या जमिनी संपादित करून जवळपास दहा वर्षे उलटून गेली आहेत. एवढा कालावधी उलटून गेला असताना सुद्धा संपादित ठिकाणी विमान तळाचे काहीही काम झालेले नाही. मुळात सोलापूरच्या विमानतळासाठी बोरामणी परिसरातील जी जागा आहे ती योग्य नाही. सोलापूरचे विमानतळ जिल्ह्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मद्यवर्ती ठिकाणी गरजेचे आहे. विमानतळा साठी बोरामणीची जागा सोलापूरच्या एका बाजूला आहे.

पंढरपूर हे राज्यासह देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. जर पंढरपूर येथे विमानतळ झाले तर पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्याचा विकास तिरुपती बालाजीच्या धर्तीवर होईल. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या हजारो तरुणांना या विमान तळामुळे रोजगार सुद्धा उपलब्ध होईल. विशेष म्हणजे पंढरपूर हे ठिकाण अवघ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे. या सर्व बाबी संतोष पाटील यांनी माढयाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या दृष्टीला आणून दिली. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र विमान तळासाठी अगदी योग्य ठिकाण असून याच ठिकाणी विमानतळ करावे यासाठी केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे आश्वासन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संतोष पाटील यांना दिले आहे.

सोलापूरच्या विमानतळाच्या नावाखाली बोरामणी येथील जी जागा संपादित केली आहे ती जागा एखाद्या मोठ्या केंद्रीय उद्योसाठी वापरण्यात यावी असेही संतोष पाटील यांनी सुचविले आहे. या ठिकाणी एखादा मोठा उद्योग उभारल्यास सोलापूर शहारातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम देता येईल आणि यामुळे शहरातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल असे संतोष पाटील यांनी म्हटले आहे.दरम्यान केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी या संदर्भात दहा सप्टेबर रोजी बैठक आयोजीत करण्याचे अश्वासन दिल्याचे संतोष पाटील यांनी सांगीतले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com