esakal | कामाठीच्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळली ! कामाठीच्या पत्नीस अंतरिम जामीन
sakal

बोलून बातमी शोधा

199241_109861255836752_115627169_n - Copy.jpg

कामाठीच्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

अशोक चौक परिसरातील राजभुलक्ष्मी इमारत कोंचिकूर्वी गल्ली येथील मटका बुकीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 ऑगस्टला छापा टाकला. अवैध व्यवसाय प्रकरणी पोलिसांनी नगरसेवक सुनील कामाठीसह सुमारे 288 जणांविरुध्द गुन्हे दाखल केले. पोलिसांनी कामाठीला अटक केल्यानंतर त्याच्यासोबत असलेली त्याची पत्नी सुनिता कामाठी, इस्माईल मुच्छाले, रफिक तोनशाळ यांना आज (शनिवारी) प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी जे. एम. मिस्त्री यांच्यासमोर हजर केले. त्यावेळी पोलिसांनी नगरसेवक कामाठी व इस्माईल मुच्छाले यांना आणखी तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी द्यावी, अशी माणगी केली. मात्र, यापूर्वी दिलेली पोलीस कोठडी पुरेशी होती. संशयित आरोपींना अटक केल्याने आरोपींकडून आणखी काही जप्त करण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. त्यामुळे संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली

कामाठीच्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळली ! कामाठीच्या पत्नीस अंतरिम जामीन

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : मटका बुकीप्रकरणात अटकेत असलेला नगरसेवक सुनिल कामाठीला वाढीव पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली. मात्र, ही मागणी फेटाळून लावत न्यायालयाने सुनिल कामाठी, इस्माईल मुच्छाले व रफिक तोनशाळ यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली. तर कामाठीच्या पत्नीस अंतरिम जामीन मंजूर केल्याची माहिती संशयित आरोपींच्या वकिलामार्फत देण्यात आली.

अशोक चौक परिसरातील राजभुलक्ष्मी इमारत कोंचिकूर्वी गल्ली येथील मटका बुकीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 ऑगस्टला छापा टाकला. अवैध व्यवसाय प्रकरणी पोलिसांनी नगरसेवक सुनील कामाठीसह सुमारे 288 जणांविरुध्द गुन्हे दाखल केले. पोलिसांनी कामाठीला अटक केल्यानंतर त्याच्यासोबत असलेली त्याची पत्नी सुनिता कामाठी, इस्माईल मुच्छाले, रफिक तोनशाळ यांना आज (शनिवारी) प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी जे. एम. मिस्त्री यांच्यासमोर हजर केले. त्यावेळी पोलिसांनी नगरसेवक कामाठी व इस्माईल मुच्छाले यांना आणखी तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी द्यावी, अशी माणगी केली. मात्र, यापूर्वी दिलेली पोलीस कोठडी पुरेशी होती. संशयित आरोपींना अटक केल्याने आरोपींकडून आणखी काही जप्त करण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. त्यामुळे संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून लावत चारही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी ठोठावली. त्यानंतर नगरसेवक कामाठी याची पत्नी सुनिता कामाठीला पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्‍यावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणात संशयित आरोपींतर्फे ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. विनोद सूर्यवंशी, ऍड. श्रीकांत पवार यांनी तर सरकार पक्षातर्फे ऍड. देवमाने यांनी काम पाहिले.

loading image
go to top