पीएचडीकरिता मंगळवारी 795 जागांसाठी मुलाखती | Educational | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएचडीकरिता मंगळवारी 795 जागांसाठी मुलाखती
पीएचडीकरिता मंगळवारी 795 जागांसाठी मुलाखती!

पीएचडीकरिता मंगळवारी 795 जागांसाठी मुलाखती

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) पीएचडीच्या (PhD) 795 जागांसाठी मंगळवारपासून (ता. 16) मुलाखती (Interviews) घेतल्या जाणार आहेत. 16 ते 22 नोव्हेंबर असा मुलाखतीचा कार्यक्रम असणार आहे. यंदा वेटिंग यादी न लावता गुणवत्तेनुसार सर्वांनाच प्रवेश दिला जाईल, अशी माहिती प्रशासकीय अधिकारी डॉ. विकास कदम (Dr. Vikas Kadam) यांनी दिली.

हेही वाचा: 'NIELIT'मध्ये शास्त्रज्ञ पदांची भरती! जाणून घ्या सविस्तर

विद्यापीठाच्या माध्यमातून आवडत्या विषयातून संशोधनाची संधी मिळावी म्हणून पुणे, जळगाव, मुंबईसह अन्य विद्यापीठातील उमेदवारांनी पीएचडीसाठी अर्ज केले आहेत. प्रत्येक जागेसाठी तीन उमेदवारांना गुणवत्तेनुसार मुलाखतीची संधी देण्यात आली आहे. परंतु, मागासवर्गीय प्रवर्गातील काही उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातूनही अर्ज केले असून, त्यांना दोन्हीकडे संधी मिळाली आहे. आता त्या उमेदवारांच्या पसंतीनुसार त्यांना त्या प्रवर्गातून प्रवेश मिळणार आहे. रिक्‍त जागेवर गुणवत्तेनुसार दुसऱ्या उमेदवाराला संधी मिळेल, असेही कदम यांनी या वेळी स्पष्ट केले. मुलाखतीसाठी परजिल्ह्यातून येणाऱ्यांसाठी विद्यापीठाने राहण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, उमेदवारांना हेलपाटे मारायला लागू नयेत म्हणून मुलाखतीचे वेळापत्रक निश्‍चित करून कमी कालावधीत दोन हजार 385 उमेदवारांच्या मुलाखती उरकण्याचेही नियोजन आहे.

हेही वाचा: बोकडांच्या मदतीने वीजनिर्मिती! दोन चिमुकल्यांचा आविष्कार

शिष्यवृत्तीसाठी स्वतंत्र टेबल

पीएचडीसाठी प्रवेश मिळालेल्या उमेदवारांना राज्य सरकारकडून बार्टी, सारथी, महात्मा फुले शिष्यवृत्ती योजनेतून अर्थसहाय्य केले जाते. दुसरीकडे, राष्ट्रीय स्तरावरून विद्यापीठ अनुदान अयोग, आयसीएचआर यांच्याकडूनही शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु, त्यासाठी नोंदणी करणे बंधनकारक असून गुणवत्तेनुसार त्यांची निवड केली जाते. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने स्वतंत्र टेबल उपलब्ध करून दिला असून त्या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करून शिष्यवृत्तीचा अर्ज करण्यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस व प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोय केली जाणार असल्याचेही डॉ. कदम यांनी या वेळी सांगितले.

loading image
go to top