'NIELIT'मध्ये शास्त्रज्ञ पदांची भरती! जाणून घ्या सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एनआयईएलआयटी
'NIELIT'मध्ये शास्त्रज्ञ पदांची भरती! जाणून घ्या सविस्तर

'NIELIT'मध्ये शास्त्रज्ञ पदांची भरती! जाणून घ्या सविस्तर

सोलापूर : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी (National Institute of Electronics and Information Technology - NIELIT) ने वैज्ञानिक पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार NIELIT च्या अधिकृत वेबसाइट nielit.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर 2021 निश्‍चित करण्यात आली आहे. विभागामार्फत एकूण 33 पदे भरण्यात येणार आहेत. अधिकृत अधिसूचनेनुसार, निवडलेल्या उमेदवाराला देशात कुठेही पोस्टिंग दिली जाऊ शकते. रिक्त पदांशी संबंधित तपशील पुढीलप्रमाणे.

हेही वाचा: प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी UPSC ने जारी केली अधिसूचना!

रिक्त जागांचा तपशील...

  • शास्त्रज्ञ सी : 28 पदे

  • शास्त्रज्ञ डी : 5 पदे

शैक्षणिक पात्रता...

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजीमध्ये शास्त्रज्ञ पदांसाठी उमेदवार अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी किंवा तंत्रज्ञानातील बॅचलर पदवीप्राप्त असावा. रिक्त पदांशी संबंधित इतर माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत अधिसूचना वाचावी.

वयोमर्यादा...

वैज्ञानिक सी पदांसाठी वयोमर्यादा 35 वर्षे आहे आणि वैज्ञानिक डी पदांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे आहे.

अशी होईल निवड प्रक्रिया...

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजीमध्ये शास्त्रज्ञ पदांसाठी चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. स्क्रिनिंग टेस्टमध्ये एकूण 150 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न असतील. तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी एक मिनिट मिळेल. अंतिम गुणवत्तेतील गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

हेही वाचा: 'बी अल्वेज टॉपर' म्हणणारे पहिल्या प्रयत्नातच अयशस्वी होतात तेव्हा...

अर्जाचा शुल्क

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजीमध्ये शास्त्रज्ञ पदांसाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क 800 रुपये तर SC / ST / PWD तसेच महिलांना 400 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

loading image
go to top