esakal | प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आयपीएस अधिकाऱ्याची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

The IPS officer credit 50 thousand PM and CM fund

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सोलापुरचे सुपूत्र तथा मुबंई येथे कार्यरत असलेले महावितरणचे सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी दतात्रय शिंदे यांनी कोरोना व्हायरससारखे संकट राज्यावर असल्याने 'फुल नाय फुलाची पाकळी' म्हणुन मुख्यमंत्री व प्रधानमंत्री सहायता निधीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आयपीएस अधिकाऱ्याची मदत

sakal_logo
By
अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सोलापुरचे सुपूत्र तथा मुबंई येथे कार्यरत असलेले महावितरणचे सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी दतात्रय शिंदे यांनी कोरोना व्हायरससारखे संकट राज्यावर असल्याने 'फुल नाय फुलाची पाकळी' म्हणुन मुख्यमंत्री व प्रधानमंत्री सहायता निधीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
कोरोना या रोगाने महाराष्ट्रासह संपुर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेली परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने केंद्र व राज्यशासन आरोग्य सेवा देत परिस्थिती हाताळण्याचे काम करीत आहेत. या अभूतपूर्व परिस्थीतीमध्ये केंद्र व राज्य सरकारवर खूप मोठ्या खर्चाचा भार पडणार आहे. यामध्ये आरोग्य यंत्रणेवर व सुरक्षा उपाययोजनावर मोठा खर्च होणार आहे. या सर्व खर्चाकरीता शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेच. परंतु कोरोनाच्या लढ्यासाठी शासनाच्या मदतीला या देशातील प्रत्येक नागरिकाने तन-मन-धनाने वाहून घ्यायला हवे. त्यामुळे शासनाला या संकटाशी सामना  करण्यासाठी ताकद मिळेल. सद्या देशासाठी काहीतरी करण्याची वेळ आलेली आहे. याचअनुषंगाने कोरोनाशी लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहायता निधीसाठी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याबाबत आवाहन केलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपणही काही ना काही योगदान करून देशसेवा केली पाहिजे. 
याच दृष्टीकोनातून मुळचे चिंचोली (बार्शी) येथील व सध्या मुंबई महावितरणचे सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले (आयपीएस) दतात्रय शिंदे यांनी पुढाकार घेत स्वतःपासुन सुरुवात करत केंद्रासाठी २५ हजार व राज्यासाठी २५ हजार रूपये असे पन्नास हजार रूपये निधी स्वरूपात जमा केले आहेत. प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी स्वतः हुन सामजिक बांधलिकी जोपासत जोपासत पुढाकर घेतल्याने त्यांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.

थेंबे थेंबे तळे साचे
कोरोनामुळे संपुर्ण देश अडचणीत असताना हिच खरी देशसेवा करण्याची संधी आहे. या भावनेतून मदतीसाठी हात पुढे केला आहे. आपल्या एकट्याच्या निधी देण्याने काय होईल असा विचार न करता थेंबेथेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे सर्वांचे मदतीसाठी हात सरसावले पाहिजेत. 
- दतात्रय शिंदे (आयपीएस),
सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी महावितरण, मुंबई

loading image