

सोलापूर : एकाने ज्येष्ठ नागरिकाला सोशल मीडियावरून ऑडिओ, व्हिडिओ कॉल करून आयपीएस व सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून आक्षेपार्ह संदेश व्हायरल झाल्याने त्यांच्याविरुद्ध कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने डिजिटल अरेस्ट करण्यात आल्याचे सांगून न्यायालयाचे बनावट आदेश पाठवून रक्कम परत मिळेल असे सांगून वेगवेगळ्या खात्यात रक्कम भरून घेऊन २७ लाख १० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना शहर सायबर गुन्हे शाखेने गुजरातेतील अहमदाबाद येथून अटक केली आहे. त्यांना ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.