

Infrastructure Crisis: 46-Year-Old Footbridge at Papri Becomes a Death Trap
Sakal
मोहोळ : पापरी ता मोहोळ येथील उजनी डाव्या कालव्या वरील किलोमीटर 102 मधील पदचारी फुल अत्यंत धोकादायक बनला असून, त्यावरून जाणे येणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूलाच आमंत्रण दिल्या सारखे आहे. याच पदचारी पुलाचे गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी केलेले काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. त्या ठिकाणी मोठा सिमेंट नाला बांधावा अशी मागणी शेतकऱ्यां मधून होत आहे.