उत्पन्न दाखल्याची अट रद्द करण्याची मागणी; वयोवध्दांची होतेय परवड

It is being demanded to cancel the condition of income certificate of tehsildar.jpg
It is being demanded to cancel the condition of income certificate of tehsildar.jpg
Updated on

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोना संकटात वयोवृध्दाची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाच्या असतानाच अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीमेच्या नावाखाली उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वयोवध्द नागरिकांसह 28 हजार 755 कार्डधारकांची परवड होत आहे. त्यातील तहसिलदाराच्या उत्पन दाखल्याची अट रद्द करण्याची मागणी होत आहे. 
 
राज्यातील बोगस शिधापत्रिका शोध घेण्यासाठी अन्न पुरवठा खात्यांनी अंतोदय, बी.पी.एल व प्राधान्य शिधापत्रिकामधील सर्व सदस्याची आधार कार्ड झेराक्‍स, बँक पासबुक, महिला कुटूंब प्रमुख फोटो, गॅस पुस्तक आदीसह तहसीलदाराच्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट करण्यात आली. त्यासंदर्भातील सूचना गावच्या रास्त भाव दुकानदारांनी या कार्डधारकांना दिल्या. धान्य बंद होईल या भितीने पळापळ सुरू झाली. 

सध्या तालुक्‍यातील अन्नपूर्णा 73, अंतोदय 3693, प्राधान्य व अन्नसुरक्षा 24989 इतके कार्डधारक असून त्या शिधापत्रिकांच्या तपासणीसाठी उत्पनाच्या दाखल्याची अट करण्यात आली असून सदर उत्पन्न दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम तलाठयाकडे जावे लागते, परंतु बहुसंख्य तलाठ्यानी नियुक्त गावाऐवजी मंगळवेढयातून कारभार सुरु केला. त्यात पोटनिवडणुकीची प्रशासकीय कामे यामुळे ग्रामीण भागातून शहरात आलेल्या नागरिकांची आणि तलाठयाची भेट होत नाही. त्यात बहुसंख्य दाखल्यावर तलाठयांनी सही करुन झिरो तलाठयाकडे दिले. पण तेही मिळेनासे झाले. त्यामुळे तलाठयाच्या दाखल्यासह तहसीलदाराचा उत्पन्न दाखला काढण्यासाठी या वयोवृध्द नागरिकांनाही मंगळवेढयास यावे लागते. 

सिमावर्ती भागातून मंगळवेढयास आल्यावर एका दिवशी काम न झाल्यास दुसऱ्यांदा हेलपाटे मारावे लागते. यात सर्वच कार्डधारकांची परवड व आर्थिक नुकसान होत आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुभाव लक्षात घेता होणाऱ्या पोट निवडणुकीसाठी प्रशासनाने वयोवृध्द नागरिकांना टपाली मतदानाचा पर्याय दिला असताना शिधापत्रिका तपासणी मोहीमेत दाखला काढण्यासाठी पळापळ करुन पुरवठा विभागाने वयोवध्दाचे हाल होत आहेत. वास्तविक पाहता आधार वरुन बोगस कार्डधारकांची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध करणे शक्‍य असताना कोरोना संकटात पुन्हा कार्डधारकांना त्रासदायक वागणूक अन्न पुरवठा विभागाने कशासाठी देत आहे, असा सवाल तालुक्‍यातील नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. 

कोरोनाच्या संकटात जगणे मुश्‍कील होत असताना नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना प्रशासन देत आहे. त्यात दिव्यांग व वयोवध्दांना हेलपाटे करण्यापेक्षा तहसीलदाराच्या दाखल्याऐवजी तलाठयाचा पर्याय प्रशासनाने दयावा. 
- समाधान हेंबाडे, अध्यक्ष प्रहार संघटना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com