कार्यकर्त्यांना सत्तेचा फायदा मिळवून देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde

कार्यकर्त्यांना सत्तेचा फायदा मिळवून देणार

पंढरपूर - राज्यात सत्तेत असताना देखील शिवसैनिकांचे खच्चीकरण केले जात होते. शिवसैनिकांवर अन्याय होत होता. शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात होते. आपण शिवसैनिकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्याला मर्यादा होत्या. आता एकाही शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही. कार्यकर्त्यांना सत्तेचा फायदा मिळवून देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख महेश साठे यांनी आयोजित केलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिंदे बोलत होते. ते म्हणाले, आजचा मेळावा एकनाथ शिंदे यांच्या गटाचा आहे, अशा स्वरूपाच्या बातम्या आपण काही चॅनेलवर पाहिल्या, परंतु हा मेळावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसैनिकांचा आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीतून पुढे जाणाऱ्या शिवसैनिकांचा हा मेळावा आहे.

पंढरपूरला आज आलो असताना वारकऱ्यांमधून मोठ्या आनंदाने आपले स्वागत केले गेले. त्यांच्या या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. हे लक्षात घेऊन आजपर्यंत सरकारकडून जे झाले नाही, ते पंढरपूरच्या विकासासाठी केले जाईल. पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करू. पंढरपूर आणि परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जाईल. आपण सर्वजण बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत. आपले हिंदुत्व सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. आपण मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा या राज्यातील जनतेचा सेवक म्हणूनच काम करेल. जेंव्हा जेंव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा मंत्रालयातील मुख्यमंत्री दालन तुम्हा सर्वांसाठी खुले असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Web Title: It Will Give Workers Benefit Of Power Chief Minister Eknath Shinde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..