Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कालव्याद्वारे पाटकुल येथील चिनोबा तलाव भरून द्यावा, आढेगाव चे दोन तलाव भरून द्यावेत.
prabhakar deshmukh fasting

prabhakar deshmukh fasting

sakal

Updated on: 

मोहोळ - आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कालव्याद्वारे पाटकुल येथील चिनोबा तलाव भरून द्यावा, आढेगाव चे दोन तलाव भरून द्यावेत, कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला त्वरित शेतकऱ्यांना द्यावा, या मागण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी मंगळवार ता. 6 ऑक्टोबर पासून कालव्यातच प्राणांतीक उपोषण सुरू केले आहे. मंगळवार ता. 13 ऑक्टोबर रोजी उपोषणाचा 8 दिवस होता, मात्र एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. दरम्यान देशमुख यांची प्रकृती खालावली असून, त्यांचे 4 किलो वजन घटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com