

Farmers' Struggle: Protest Against Jakraya Sugar Factory Over Pending Payments
Sakal
मोहोळ : वटवटे ता मोहोळ येथील जकराया शुगर या साखर कारखान्याने सन 2025/26 च्या चालु गळीत हंगामात जाहीर केलेल्या ऊस दरा पैकी 50 टक्केच रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे. उर्वरित 50 टक्के रक्कम दिलेली नाही. ती रक्कम तात्काळ 15 टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी या मागणी साठी मोहोळ तहसील कार्यालया समोर महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी बेमुदत धरणे आंदोलनास शुक्रवार पासून सुरुवात केली आहे.