esakal | सांगोला तालुक्‍यातील जयश्री लिगाडे यांनी शिवणकाम, गारमेंटद्वारे मिळवून दिला महिलांना रोजगार
sakal

बोलून बातमी शोधा

Jayshree Ligade from Sangola taluka provides employment to women through sewing and garments

जयश्री लिगाडे यांनी सांगितले, की महिलांमध्ये आत्मविश्वास असेल तर आपण कोणत्याही व्यवसाय, उद्योगात यशस्वी होवू शकतो. मला माझ्या उद्योगात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड यांचे मार्गदर्शन व व्यवसाय वाढीसाठी मोलाची मदत झाली आहे. त्यामुळेच मी आज इतर महिलांना रोजगार उपलब्ध करु शकले. 

सांगोला तालुक्‍यातील जयश्री लिगाडे यांनी शिवणकाम, गारमेंटद्वारे मिळवून दिला महिलांना रोजगार

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील जवळेसारख्या ग्रामीण भागात सुरवातील स्वतः महिलांसाठी विविध प्रकारचे कपडे शिवण्याचे काम करीत होत्या. यातूनच त्यांनी व्यवसाय वाढवीत अनेक महिलांना काम तर दिलेच त्याचबरोबर स्वतःचा गारमेंट व्यवसाय सुरु केला. बचत गटाच्या माध्यमातून विविध पदार्थ बनविण्याचेही काम मोठ्या आत्मविश्वासाने आज करीत आहेत, त्या म्हणजे सांगोला तालुक्‍यातील जवळा येथील जयश्री प्रदीप लिगाडे. 

जयश्री लिगाडे यांच्या पतीचा भुसार मालाचा व्यापार आहे. परंतु स्वतःचा एखादा व्यवसाय असावा, असे त्यांना नेहमी वाटत होते. त्यातूनच आपल्या कुटुंबालाही आर्थिक मदत होईल, यासाठी प्रथमतः महिलांचे कपडे शिवण्याचे काम करु लागल्या. कामाचा व्याप वाढू लागल्याने त्यांनी इतर शिलाई मशीन खरेदी करुन आपल्यासारख्या महिलांना कपडे शिवून रोजगार देण्याचा उद्योग सुरु केला. महिलांचे विविध प्रकारचे कपडे शिवणकाम सुरु केल्यानंतर त्यांनी महिलांचे कपडे विक्री सुरू केली. यामुळे दोन्ही बाजुंनी उद्योगाची सुरुवात झाली. 

आज त्यांनी जवळेसारख्या ग्रामीण भागात गारमेंट व्यवसायही सुरु केला आहे. तसेच आठ मशिनद्वारे विविध प्रकारचे महिलांचे कपडे शिवण्याचे कामही जोमाने सुरु आहे. परिसरातील महिला भगिनींना कपड्याबरोबरच शिवणकामही करुन मिळत असल्याने त्यांच्या व्यवसायाला गिऱ्हाईकांची संख्या मोठी वाढू लागली आहे. त्यांनी स्वतःबरोबरच आपल्यासारख्या अनेक महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. याबरोबरच त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ बनविण्याचे काम सुरु झाला केले आहे. ऑर्डरप्रमाणे बचत गटाद्वारे त्या पदार्थ बनवून दिले जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमिवर ऑर्डरीही चांगल्या मिळू लागल्या आहेत. आपल्या या व्यवसायात घरच्यांचे सहकार्य चांगले मिळत असल्याचे त्या आवर्जून सांगतात. 

कापड व्यवसायाबरोबरच लिगाडे यांचा शिवणकाम उद्योग सुरु आहे. कोरोनाच्या काळात व्यवसाय मंदीमध्ये मास्कची वाढती मागणी लक्षात घेता जयश्री लिगाडे यांनी 10 हजार मास्क तयार करुन विक्रीही केली आहे. बाजारात जे हवे आहे, ते त्यांनी त्यावेळेस बनवून घेवून विक्री केली. अजूनही अनेक ठिकाणाहून त्यांना मास्क बविण्यासाठी विचारणा होत असते. 

संपादन : वैभव गाढवे 

loading image
go to top