Karmala News: आमदार पुत्राच्या कमलाभवानी शुगरचे प्रदूषण तातडीने बंद करा; जयवंतराव जगताप

कारखान्यातून मळी मिश्रीत पाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे आसपास मोठ्या प्रमाणात दुर्गंधी
JAYWANTRAO JAGTAP Karmala News
JAYWANTRAO JAGTAP Karmala Newssakal

Karmala News : शहरालगत असलेल्या आमदार बबनराव शिंदे यांच्या पुत्राच्या श्री विठ्ठल शुगर रिफाइंड शुगर ( कमलाभवानी शुगर ) या साखर कारखान्याच्या प्रदुषणामुळे नागरीकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कारखान्याने तातडीने प्रदूषण बंद करण्याची उपाययोजना करावी अशी मागणी जयवंतराव जगताप यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे लेखी निवेदनाव्दारे केली.

या  कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे हे माढ्याचे बबनराव शिंदे यांचे चिरंजीव तर करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांचे पुतणे आहेत. या बाबतचे निवेदन मुख्यमंञी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

जयवंतराव जगताप यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहरालगत श्री विठ्ठल रिफाइंड शुगर प्रा .लि .पांडे हा साखर कारखाना असून सदर साखर कारखान्याने प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित केली नसल्याने या कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर राख व काजळी बाहेर पडून आसपासच्या परिसरात सर्वत्र पसरत आहे.

सदर कारखाना शहरालगत कमलादेवी मंदीर परीसरात आहे. या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे. या फॅक्टरीतून तयार होणाऱ्या राखेचे लोट संपूर्ण शहरात व घराघरांत पडत असून यामुळे नागरीकांना श्वसनाचे आजार बळावले असून सर्वसामान्य जनतेच्या स्वच्छतेचा व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला.

तरी या बाबींची गंभीर दखल घेवून तातडीने या शुगर फॅक्टरीने प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविली आहे काय? असल्यास ती कार्यान्वित आहे का? नसल्यास त्वरीत प्रदूषण बंद करणेबाबतच्या व उपाययोजना आपले स्तरावरून सूचना देवून कार्यवाही करण्यात यावी.

त्याचबरोबर सदर कारखान्यातून मळी मिश्रीत पाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे आसपास मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून परिसरातील पाण्याच्या स्त्राेताचा दर्जा खालावला असून शेतजमिनींचा पोत खराब होत आहे.

या बाबींचा गांभीर्याने विचार करून प्रदूषण कमी करणेबाबत कार्यवाही साठी तातडीने आदेश द्यावेत. या निवेदनाच्या प्रती कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उप - प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com