
सोलापूर: शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील विनायक नगर व बोळकोटे नगरात रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. बंडू मधूकर पवार (वय २८, रा. ढोकबाभुळगाव, ता. मोहोळ) व उमेश प्रकाश काळे (वय ३०, रा. मलिकपेठ, ता. मोहोळ) अशी त्या संशयितांची नावे आहेत.