Barshi Crime
Sakal
सोलापूर
Barshi Crime: 'बार्शीत बसस्थानकातून तीन लाखांचे दागिने लंपास'; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Barshi bus stand crime: बार्शी शहरातील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या मोठ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. एका प्रवाशाचे तब्बल तीन लाख रुपये किमतीचे दागिने बसस्थानकातून लंपास झाल्याची माहिती पुढे आली आहे.
बार्शी: शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात महिला बसमध्ये चढत असताना चोरट्याने पर्समधील सोन्याचे दागिने ठेवलेल्या दोन लहान पर्ससह रोख दीड हजार रुपये लंपास केले असून, तीन लाखांची चोरी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

