
मोहोळ: राहत्या घराच्या स्वयंपाक खोलीतील वाटीत ठेवलेले ३ लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने १० जून रोजी मिळून आले नाहीत. सर्व नातेवाईकांसह कुटुंबातील व्यक्तीकडे ही दागिन्याविषयी चौकशी केली असता, दागिने न मिळून आल्याने, अज्ञात चोरट्याने दागिन्याची चोरी केल्याची खात्री झाल्याने बुधवारी (ता. २३) मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.