
मंगळवेढा : 10 तोळे सोन्याच्या दागिने चोरीच्या तीन घटनेतील 4 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 7 आरोपीला ताब्यात घेण्यास मंगळवेढा पोलिसांना यश आले.चोरीच्या घटनेतील तपास यशस्वी होऊ लागल्याने सर्वसामान्य नागरिकता निर्दास्त होऊ लागले.
या तपास कामाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. अधिक माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पो.नि.रणजित माने म्हणाले की पहिल्या घटनेतील फिर्यादी चंद्रकला सुग्रीव दराडे वय 52रा. एसटी डेपो कॉटर्स या 20 एप्रिल रोजी सोलापूर येथे बसमधून जात असताना त्यांच्या पिशवीत ठेवलेले दागिने 1.5 लाखाचे 3 तोळे नेकलेस,1 लाखाचे 2 ग्रॅम कानातील जोड, 20 हजार रुपयाची 4 ग्रॅम वजनाची नथ, 10 हजार रुपयाचे 2 ग्रॅम पेडल, 10 हजाराचे 2 ग्रॅम मंगळसूत्र असाच सहा पॉईंट सहा ग्रॅम वजनाचा 3 लाख 30 हजाराच्या सोन्याच्या दागिन्याची चोरी झाली त्यावेळी त्यांच्याशी चार महिलांनी जवळीक साधल्याचे लक्षात आले.
या घटनेने एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची झोप उडाली दरम्यान पोलिसांनी या घटनेचा तपास करत अंजली राम भुई, गीता बालाजी भोगी,कीर्ती शिनो भोई, ज्योति बालाजी भोगी, सर्वजण रा. मुकुंदवाडी जि. औरंगाबाद या चार महिलांना पोलिसांनी कळंब जिल्हा उस्मानाबाद येथे पकडले. त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली व सोने राहू उर्फ रवि उर्फ मल्लेश गजवार रा.मुकुंदवाडी जिल्हा औरंगाबाद यांच्याकडे दिल्याचे सांगितले. व ते सोन्याचे दागिने बदलापूर येथील दुकानातून काढून दिले.
दुसऱ्या घटनेतील फिर्यादी प्रियंका सुनील शिंदे रा.पाठखळ हिचे घरी नातेवाईक म्हणून आलेल्या सोमनाथ हनुमंत शिंदे राहणार बेंबळे ता. माढा याने जेवण खान करून उघड्या कपाटातील 12 ग्रामचे मंगळसूत्र किंमत 60 हजार रुपये,4.250 ग्रॅम कानातील बेल किंमत 20 हजार, 4.150 कानातील झुबे किंमत 20 हजार असा 1 लाखाचा सोन्याचा ऐवज चोरून नेला होता तर तिसऱ्या घटनेत भाग्यश्री कोष्टी यांची आयुर्वेदिक औषधाच्या देवान घेऊन मानकेश मनोहर लोणी रा.उमदी याच्याबरोबर ओळख झाली त्यावेळी त्यांच्यातील आर्थिक व्यवहारातून भाग्यश्री कोष्टीच्या गळ्यातील चेन छान दिसते कार्यक्रम आहे तोपर्यंत द्या कार्यक्रमानंतर परत येतो असे सांगून सदरची 50 हजार किंमतीची 1 ग्रॅमची चेन परत मागणी केली असता तुला काय करायचं ते कर म्हणून टाळाटाळ केली म्हणून फिर्याद दाखल केले या प्रकरणी पोलिसांनी मानतेस लोणी यास उमदी येथून येथे ताब्यात घेतले.
सदर चोरीचा तपास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील पोलीस निरीक्षक रणजित माने,स. पो. नि.बापूसाहेब पिंगळे,पो. हे. सलीम शेख, दयानंद हेंबाडे, मनसिद्ध कोळी, खंडप्पा हाताळे, श्रीमंत पवार, महेश पोरे, दत्तात्रय येलपले,पुरूषोत्तम धापटे, विठ्ठल विभूते, वैभव घायाळ यांनी केले
यापूर्वी दोन दरोडे व आठ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहे त्यामुळे चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये जे भीतीची वातावरण निर्माण झाले मात्र पोलिसांच्या तपास कार्यामुळे आरोपी व मुद्देमाल सापडू लागला. तपास कार्याबद्दल पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यां ची कामगिरी कौतुकास्पद ठरली
राजश्री पाटील उपभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.