सोलापूरच्या हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयीन अन्‌ रस्त्यावरच्या लढाईचा निर्धार !

सोलापूरच्या हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयीन अन्‌ रस्त्यावरच्या लढाईचा निर्धार
Ujani Meeting
Ujani MeetingCanva

सोलापूर : उजनी धरणातून (Ujani Dam) इंदापूरला (Indapur) पाच टीएमसी पाणी देण्यासंदर्भात सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharane) यांनी सोमवारी पुण्यातील सिंचन भवन येथे सोलापूर जिल्ह्यातील उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील व इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी या बैठकीत एकामेकांसमोर भिडले. त्यामुळे ही बैठक फिस्कटली. दरम्यान, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने पुढील आंदोलनाची दिशा येत्या दोन दिवसांत ठरवली जाणार आहे. त्यासाठी समितीची लवकरच बैठक होणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी टिकविण्यासाठी न्यायालयीन लढाईसोबतच रस्त्यावरची लढाई करण्याचीही तयारी समितीने केली आहे. (Judgment of the court and the street fight for the right to water of Solapur)

आमचं पाणी चोरलंय !

आमचं (सोलापूरच्या हिश्‍श्‍याचं) पाणी चोरलंय आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे गोलमाल दिली जात आहेत. आजच्या बैठकीत भरणे यांनी जे सांगितलं आहे, ते पूर्णपणे खोटे आहे. मुळात उजनी धरणात सांडपाणी येतच नाही, असं पुणे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मात्र, याप्रकरणी अधिकारी आणि पोलिसांवर मोठा दबाव आहे. यापुढचे आंदोलन आम्ही गोविंद बागेत करू.

- अतुल खुपसे, अध्यक्ष, उजनी धरण पाणी संघर्ष समिती

Ujani Meeting
इंदापूरला सांडपाणी देण्याची योजना म्हणजे "आजार रेड्याला अन्‌ इंजेक्‍शन पखालीला'चाच प्रकार

भरणेंनी निकटवर्तीयांना बैठकीत घुसवले

उजनीच्या पाच टीएमसी पाण्याबाबत झालेल्या बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाणीवपूर्वक इंदापूर तालुक्‍यातील निकटवर्तीय कार्यकर्ते व सोलापूर जिल्ह्यातील निकटवर्तीयांना बैठकीत घुसवले. त्यामुळे दोन गटांत जबरदस्त राडा झाला. ही बैठक अयशस्वी झाली आहे.

- माऊली हळणवर, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती

Ujani Meeting
सोमवारी एकाच दिवशी 2010 जण कोरोनामुक्त ! 56 रुग्णांचा मृत्यू: 1332 नवीन बाधित

वेळप्रसंगी रक्ताचे पाट वाहतील

उजनी धरणातून इंदापूरसाठी एक थेंब पाणी जाऊ दिले जाणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना प्रलंबित आहेत. या योजनांच्या वाट्याचे पाणी इंदापूरला पळविले जात आहे. वेळप्रसंगी रक्ताचे पाट वाहतील पण उजनी धरणातून इंदापूरला पाणी जाऊ दिले जाणार नाही.

- प्रभाकर देशमुख, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती

पालकमंत्री भरणेंचा भांडणे लावण्याचा प्रयत्न

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रतिनिधींसाठी बैठक बोलावली असताना या बैठकीत इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी उपस्थित राहतातच कसे? सोलापूर जिल्ह्यातील प्रतिनिधी व इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न पालकमंत्री भरणे यांनी केला आहे.

- दीपक भोसले, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com