हरणाच्या अवघ्या दोन दिवसांच्या पाडसाला मिळाले शेळीच्या दुधामुळे जीवदान !

हरणाच्या अवघ्या दोन दिवसांच्या पिल्ला मिळाले शेळीच्या दुधाने जीवदान
Deer
DeerCanva
Updated on

सोलापूर : आईचे दूध म्हणजे अमृतच होय. जन्म होताच आईचे दूध आवश्‍यकच. मात्र शेळगी- दहिटणे शिवारात अशोक मसूती यांच्या शेताजवळ मातृदिनाच्या पूर्वसंध्येला शेळीच्या दुधाने हरणाच्या अवघ्या दोन दिवसांच्या जखमी पडसाला जीवदान मिळाले. (Just two days old deer calves survived with goats milk)

शेळगी शिवारात शनिवारी (ता. 8) सायंकाळी पाचच्या दरम्यान एका कुत्र्याने नुकताच जन्मलेल्या हरणाच्या पिल्लावर हल्ला केला. त्या वेळी लगेच शेतकरी अशोक मसूती व अप्पाराव कांबळे यांनी त्या पाडसाची कुत्र्यापासून सुटका करून शेळगी पोलिस चौकीत आणले. शेळगीत असलेले नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य सिद्राम येलशेट्टी यांना शेळगी पोलिस चौकीत असलेले पो हेड कॉन्स्टेबल शहाजी दुधाळ व मसूती यांनी याबद्दल माहिती दिली. तत्काळ येलशेट्टी यांनी पाडसाला ताब्यात घेऊन घटनेची माहिती मानद वन्यजीव रक्षक व नेचर कॉन्झर्वेशन सर्कलला दिली. लगेचच मानद वन्यजीव रक्षकांनी येलशेट्टी यांना तिथं पोचेपर्यंत पिल्लास लिंबूचे रस पाजण्याची सूचना केली, जेणेकरून पिल्लू घाबरून न जाता त्याला थोडा धीर मिळण्यास मदत होईल.

Deer
बालरोगतज्ज्ञ म्हणतात, तिसऱ्या लाटेत लहान मुले बनू शकतात सुपर स्प्रेडर ! अशी घ्या खबरदारी

मानद वन्यजीव रक्षक, नेचर कॉन्झर्वेशनचे सदस्य हे घटनास्थळी पोचून पाडसाची तपासणी केली असता, कुत्र्याने पाडसाच्या मांडीजवळ जखम केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या पिल्लाच्या जखमेवर हळद लावून प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर मानद वन्यजीव रक्षक यांनी हे पिल्लू अवघ्या दोन दिवसांचे असल्याने त्याला त्याच्या आईच्या दुधाची गरज ओळखून जवळच असलेल्या शेळीचे दूध पाजले. काही वेळातच पिल्लू उड्या मारू लागले.

थोड्या वेळाने त्या पिल्लास जिथं हे जखमी आढळून आले होते, त्याच ठिकाणी घेऊन जाताच हरणाचे पाडस आईला पाहताच उड्या मारत- मारत कळपात निघून गेले. या वेळी मानद वन्यजीव रक्षक, नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य, शेतकरी अशोक मसूती, अप्पाराव कांबळे, सिद्राम येलशेट्टी, वनपाल शंकर कुताटे, वनरक्षक अनिता शिंदे, शेळगी पोलिस चौकीचे पोलिस हेड कॉन्स्टेबल शहाजी दुधाळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com