
टेंभुर्णी : आर्थिक फायद्यासाठी परजिल्ह्यातील महिलांना कलाकेंद्रात आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करणाऱ्या परिते (ता.माढा) येथील साई कलाकेंद्रावर धाड टाकून पाच पुरुष आणि चार महिला अशा नऊ जणांना अटक केली आहे. आरोपी कलाकेंद्रात १३ महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. चार महिलांना न्यायालयीन कोठडी पाच पुरुषांना पोलिस कोठडी दिली आहे.