Kalicharan Maharaj : आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या कालीचरण महाराजांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे. संविधानाचे शुद्धीकरण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारं संविधान पुनर्निर्मित केलं पाहिजे, असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सोलापुरात माध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केलं.